Dhanjay Munde on Prakash Mehta | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

बँकेत चोरी करायला गेला आणि आलार्म वाजला तर चोरावर गुन्हा नाही का?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

प्रकाश महेता प्रकरणावर धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्याना सवाल      

मुंबई : बँकेत  चोरी करायला गेला आणि आलार्म वाजला  तर पकडलेल्या चोरावर गुन्हा नाही का? असा सवाल प्रकाश मेहता प्रकरणावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना  केला आहे.

प्रकाश महेता प्रकरणावर धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्याना सवाल      

मुंबई : बँकेत  चोरी करायला गेला आणि आलार्म वाजला  तर पकडलेल्या चोरावर गुन्हा नाही का? असा सवाल प्रकाश मेहता प्रकरणावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना  केला आहे.

गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने  विधान परिषदेचे कामकाज गुरुवारी  दिवसभरासाठी  तहकुब झाले. तत्पूर्वी, पारदर्शी सरकारचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासकांना 1 हजार कोटींचा फायदा करून देणाऱ्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.  

यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "ज्या प्रकरणावरून विरोधक मागणी करत आहेत त्या फायलीवर सही झाली नव्हती. निर्णय झाला नाही तर भ्रष्टाचार कसा असा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असली तरी ही राजीनाम्याची मागणी करून विरोधक हे राजकीय हेतूने आरोप करत आहेत.'' असे मुख्यमंत्री म्हणाले.  

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.  मुख्यमंत्र्यांनी फायलीवर सही केली असती तर प्रकरण लगेच बाहेर आले नसते, असे सांगत मुंडे यांनी मार्मिक उदाहरण देऊन सभागृहाचे लक्ष वेधले.  'बँकेत चोरी करायला गेला आणि आलार्म वाजला तर पकडलेल्या चोरावर गुन्हा नाही का?' असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. त्यानंतर काँगेस राष्ट्रवादीचे आमदार वेल मध्ये आले आणि त्यांनी प्रकाश महेता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभापतीं रामराजे निंबाळकर यानी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

संबंधित लेख