dhanjay munde drives sharad pawar`s car | Sarkarnama

शरद पवारांच्या गाडीचे धनंजय मुंडे झाले चालक!

दत्ता देशमुख
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

बीड : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बीड येथे झालेल्या आज मेळाव्यानिमित्त विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या गाडीचे सुकाणू हाती धरले. खुद्द मुंडेच चालक झाल्याने तो साहजिकच चर्चेचा विषय झाला.

बीड : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बीड येथे झालेल्या आज मेळाव्यानिमित्त विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या गाडीचे सुकाणू हाती धरले. खुद्द मुंडेच चालक झाल्याने तो साहजिकच चर्चेचा विषय झाला.

राष्ट्रवादीच्या विजयी संकल्प मेळाव्यासाठी पवार यांचे काल हेलिकाॅप्टरने बीड येथे आगमन झाले. तेथून मुंडे यांनी पवारांना आपल्याचा लॅंड क्रुझर गाडीत बसवून रेस्ट हाऊसवर घेऊन गेेले. आज सकाळी पवार यांनी एका कार्यालयाला भेट दिली. तेथेही मुंडे हेच चालक होते. तेथून अमरसिंह पंडित यांच्या निवासस्थानी पवार यांना दुपारच्या भोजनासाठी मुंडे घेऊन आले. भोजन उरकल्यानंतर मुंडे यांच्याच गाडीत बसून पवार हे सभास्थानी पोहोचले. मुंडे यांच्या सारथ्याबद्दल मग विविध मते व्यक्त होऊ लागली. त्यातून राजकीय अर्थही काढले जाऊ लागले.

बीडच्या राजकारणावर पवार यांनी आपल्या भाषणात टिप्पणी केली नाही. मुंडे यांनीही स्थानिक विषयांना भाषणात हात घातला नाही. राष्ट्रवादीतील काही नाराज नेते या सभेला व्यासपीठावर आवर्जून होते. आक्रमक भाषणात मुंडे यांना प्रतिसाद मिळाला. पवारांच्या गाडीच्या सुकाणुसोबत राष्ट्रवादीचे बीडमधील ड्रायव्हिंग सीटही मुंडे यांच्याकडे नाहीत ना, असाही प्रश्न स्थानिक नेत्यांना पडला.      

संबंधित लेख