dhanjay munde assuers justice | Sarkarnama

त्या नराधमावर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही : धनंजय मुंडे

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

पुणे : तुमच्या कुटुंबियांवरचे दुःख मोठे आहे, मात्र धीर सोडु नका, आमच्या भगिनींवर अत्याचार करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा भाऊ स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज हिंजवडी येथीलपिडीत मुलींच्या कुटुंबियांना धीर दिला तसेच या कुटुंबास एक लाख रूपयांची रोख स्वरूपात मदतही केली. 

पुण्याजवळीत हिंजवडी परिसरात राहणार्‍या एका बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे समाजात अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत असुन आज मुंडे यांनी हिंजवडी येथे त्या पिडीत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेवुन त्यांना धीर दिला. संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍यांना दुरध्वनीवरून या घटनेतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा अशी सुचना केली. 

सदर घटना हि अतिशय संतापजनक असुन या राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक नाही. शाळेत जाणार्‍या मुलीही सुरक्षित नाहीत. मुलींनाही हे सरकार सुरक्षा देऊ शकत नाही. अशी प्रतिक्रिया व्यक्त करतांनाच या प्रकरणी आपण आरोपींवर कठोरात-कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. आगामी अधिवेशनातही कायदा व सुव्यवस्थेचा तसेच ऊसतोड कामगारांचे प्रश्न, अडचणी, त्यांच्या समस्या, ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळा, ऊसतोड कामगार महामंडळ आदी प्रश्नांबाबत सरकारला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख