dhanjay munde and minister patil | Sarkarnama

धनंजय मुंडेंचा चंद्रकांतदादांना खड्ड्यांबाबत सवाल

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

गंगाखेड : परळी येथून गंगाखेड मार्गे परभणी राज्य रस्तावरून वाशिमला जात असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यानी गंगाखेड -परभणी रस्त्यावरील खड्यांचा सेल्फी घेऊन राज्या सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. 

मुंडे आज वाशिमला जात होते. दरम्यान त्यानी सेल्फी घेऊन त्यांनी ते फेसबुक व ट्‌विटरवर अपलोड केले. त्यात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी असे म्हटले आहे की "" आदरणीय चंद्रकांतदादा पाटील (सार्वजनिक बांधकाम मंत्री ) गंगाखेड परभणी रस्त्यावरील हे पहा खड्डे, सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात इतके विक्रमी खड्डे झाले आहेत की गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दखल घ्यावी, रस्ते दुरुस्तीवर मागील चार वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रुपये नेमके कोणाच्या खिशात गेले ' असा प्रश्न उपस्थित केला.

त्यानी केलेल्या ट्‌विटरवरमुळे पुन्हा एकदा गंगाखेड परभणी रस्त्याचा प्रश्न महाराष्ट्र गाजत आहे.या पूर्वी नरेंद्र मोदी बुलेट एक्‍स्प्रेस हायवे मार्ग असे नामकरण करून गांधीगिरी करून त्यांनी आंदोलन केले होते. 

संबंधित लेख