dhanjay munde | Sarkarnama

"संघर्ष यात्रे' मुळे भाजपला संवाद यात्रेची आठवण : धनंजय मुंडे

महेश पांचाळ
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेला उत्तर म्हणून राज्यात शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रा काढण्याचे जाहीर केले आहे. सरकारने आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा मग शेतकऱ्यांना भेटायला जावे असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. 

मुख्यमंत्री सरकारी यंत्रणा हातात असताना शेतकऱ्यांसाठी काही करू शकत नाहीत. तेव्हा मागील सरकारने काम केले नाही असा आरोप करत असतात. तुरीचे उत्पादन आत्ताच वाढले असताना ही तूर उत्पादक शेतकऱ्यांना का न्याय देऊ शकत नाही असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर असताना अजूनही फडणवीस हे जुन्या आठवणीत रममाण झालेले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत असे वाटत असावे. आपण मुख्यमंत्री आहात पुढील अडीच वर्षे सरकार म्हणून काम करणार आहोत याचे भान ठेवायला हवे असे मुंडे यांनी सांगितले. 

भाजपने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली होती. त्याचा विसर पडू देऊ नका. सरकारी यंत्रणेचा लोककल्याणासाठी वापर करावा याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यातील शेतकऱ्यांनी विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेला चांगला प्रतिसाद दिला म्हणून भाजप सरकारला शेतकऱ्यांशी संवाद साधावा वाटला. याचा अर्थ विरोधकांच्या संघर्ष यात्रेची सरकारने धास्ती घेतली हाच त्याचा सरळ अर्थ असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. 

संबंधित लेख