dhanjay mahadik and mandalik | Sarkarnama

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक सोशल मिडीयावर वर्षभर आधीच रंगली...

निवास चौगले
शुक्रवार, 2 मार्च 2018

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला अजून तब्बल वर्षभराचा कालावधी आहे, पण सोशल मिडीयावर कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचा प्रचार मात्र सुरू झाला आहे. "2019 ला आपले मत कोणाला' अशी विचारणा या सोशल मिडीयाव्दारे करण्यात आली असून त्यात खासदार धनंजय महाडीक विरूध्द शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्यातच मुख्य लढत होईल असे सांगण्यात आले आहे. 

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला अजून तब्बल वर्षभराचा कालावधी आहे, पण सोशल मिडीयावर कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचा प्रचार मात्र सुरू झाला आहे. "2019 ला आपले मत कोणाला' अशी विचारणा या सोशल मिडीयाव्दारे करण्यात आली असून त्यात खासदार धनंजय महाडीक विरूध्द शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्यातच मुख्य लढत होईल असे सांगण्यात आले आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असताना खासदार महाडीक यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर कोल्हापुरचे मैदान मारले. त्यावेळी त्यांचे विरोधक होते प्रा. मंडलिक. गेल्या तीन वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ झाली, त्यातून 2014 च्या निवडणुकीत श्री. महाडीक यांच्या विजयासाठी ज्यांनी जीवाचे रान केले ते राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हेच आता त्यांच्या विरोधात आहेत. 

गेल्या दोन महिन्यांपासून तर श्री. मुश्रीफ यांनी श्री महाडीक यांच्या विरोधात रान उठवायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कै. सदाशिवराव मंडलिक पुरस्काराचे वितरण, प्रा. मंडलिक यांना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली व ते आले नाहीत तर स्वतः मैदानात उतरण्याची ठेवलेली तयारी यावरून श्री. मुश्रीफ हे आगामी निवडणुकीत श्री. महाडीक यांच्या प्रचारात नसतील हे नक्की. आमदार सतेज पाटील हे तर राष्ट्रवादीची उमेदवारी श्री. महाडीक यांना मिळाली तरी ते सक्रिय रहाणार नाहीत. 

अशा परिस्थितीत श्री. महाडीक हेच राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी घेतील का नाही ? याविषयी संभ्रमावस्था आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेतेच जर त्यांच्या विरोधात असतील तर राष्ट्रवादीचे प्रमुख श्री. पवार हेही त्यांना उमेदवारी देण्याचे धाडस करतील का ? हाही प्रश्‍न आहे. या सर्व घडामोडी एकीकडे सुरू असताना सोशल मिडीयावर मात्र या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. त्यासाठी सोशल मिडीयावर एक पोस्ट "व्हायरल' झाली आहे, त्यात "2019 ला आपले मत कोणाला ? अशी विचारणा केली आहे. त्यासाठी एक नकाशाही टाकला असून त्यात 608 लोकांची मते आजमावण्यात आल्याचे म्हटले आहे. 

त्यात पहिल्या क्रमांकाची मते अर्थातच श्री. महाडीक यांना तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत ते प्रा. मंडलिक व तिसऱ्या क्रमांकावर श्री. मुश्रीफ यांचे नांव आहे. अर्थात हा संदेश श्री. महाडीक यांच्याकडूनच "व्हायरल' झाल्याचे एकूणच या संदेशातील परिस्थितीवरून दिसते. निवडणुकीला अजून वर्षभराचा अवधी असताना कोल्हापुरात मात्र त्याचा प्रचार आतापासूनच सुरू झाला हे या संदेशावरून स्पष्ट आहे. 

 

संबंधित लेख