मेंढ्यासह धनकर समाज रस्त्यावर  : ममदापूर पाटीवर केला रास्ता रोको

मराठा समाजाने आरक्षणासाठी तीव्र आंदोलन केल्यानंतर आता धनगरसमाज रस्त्यावर आला आहे. यात रविवारी (ता. १२) दुपारी ममदापूर पाटीजवळ (ता. लातूर) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मेंढ्या घेवून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
मेंढ्यासह धनकर समाज रस्त्यावर  : ममदापूर पाटीवर केला रास्ता रोको

लातूर : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजातील काही नागरीकांनी ममदापूर पाटीवर (ता. लातूर) येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे अशी समाजाची मागणी आहे.

गेल्या काही वर्षापासून हा समाज शासनाकडे मागणी करीत आहे. पण त्याकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीच्या वेळी आश्वासने  देवूनही सत्ताधाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या समाजात असंतोष पसरला आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी तीव्र आंदोलन केल्यानंतर आता धनगर समाज रस्त्यावर आला आहे. यात रविवारी (ता. १२) दुपारी ममदापूर पाटीजवळ (ता. लातूर) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मेंढ्या घेवून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. अर्धा तास हा रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ३७ कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले.

दरम्यान महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, महिला संघटना, कर्मचारी संघटनेच्या वतीने ता. १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 'धनगर, धनगड एकच जमातीसाठी वापरलेला शब्द आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषा वापरून राज्यात धनगर जमाती आदिवासी जमातीच्या यादीत क्रमांक ३६ वर धनगड, धनगर शब्द हा धनगरासाठी वापरला आहे. राज्यात एकही धनगड जमातीचे नाहीत. तर कोणी असेल तर शासनाने गावनिहाय त्याची यादी द्यावी. पण यात शासन दिशाभूल करीत आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे.', असे सांगण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com