dhangar samaj | Sarkarnama

पंकजाताई, आरक्षण केंव्हा ते सांगा ? धनगर समाजाने भर सभेत केली पंचाईत

तुषार खरात : सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 31 मे 2017

मुंबई / नगर : अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात भाषणबाजी करण्याची संधी साधण्यासाठी आलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची धनगर समाजाच्या लोकांनी भर सभेत चांगलीच पंचाईत केली. त्यांचे भाषण सुरू असताना 'धनगर आरक्षण कधी देणार' ते सांगा. धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी जोरदार मागणी उपस्थितीनांनी केली. 

जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडी (नगर) येथे आयोजित केलेल्या जयंती सोहळ्याप्रसंगी हा प्रकार घडला. दहा हजारपेक्षा जास्त जमलेल्या जनसमुदायातूनच आरक्षणाची मागणी झाल्याने पंकजाताईंची मोठी पंचाईत झाली. 

जनभावना लक्षात घेऊन पंकजाताईंनी आरक्षणावर बोलायला सुरूवात केली. 'मला जाणीव आहे की, धनगर समाजामुळेच राज्यात भाजपची सत्ता आली आहे. धनगर सामाजाला आरक्षण देण्याचा शब्द आम्ही दिला आहे. तो आम्ही पाळू. आरक्षण दिल्याशिवाय आम्ही पुढील पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जाणार नाही', अशा शब्दांत त्यांनी जनसमुदायाची बोळवण केली. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय, उत्तर प्रदेशचे पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री एस. पी. सिंह बघेल हे राम शिंदे यांच्याबरोबर अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाची पाहणी करीत असताना लोकांनी या मान्यवरांना गराडा घातला व आरक्षण कधी देणार याचा जाब विचारला. लोकांनी प्रश्‍नाचा भडिमार केल्याने केंद्रीय मंत्री बंडारू यांची पंचाईत झालीं 

आमदार गणपतराव देशमुख यांच्या भाषणाच्या वेळीही लोकांनी आरक्षणाचा धोशा लावल्याने त्यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. बंडारू दत्तात्रय यांनी जनभावना लक्षात घेत, धनगर समाजाच्या नेत्यांचे एक शिष्टमंडळ नवी दिल्लीला आल्यास त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक घडवून आणतो, असे आश्वासन दिले. 
 
संबंधित लेख