dhangar reservation | Sarkarnama

धनगर आरक्षणाची सरकारला सबुध्दी दे ; मेंढरांची आरती करुन उधळला भंडारा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

बीड : पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असे आश्वासन देणाऱ्या सरकारला चार वर्षे उलटून गेले. येत्या हिवाळी अधिवेशनात तरी धनगर आरक्षण देण्याची सरकारला सुबुद्धी द्यावी, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेंढरांची आरती करुन भंडारा उधळला. 
परिसरात झालेल्या आंदोलनात " येळकोट येळकोट जय मल्हार', " बिरुबादेवाच्या नावाने चांगभलं ' अशा घोषणांचा गजर करण्यात आला. 

मेंढर असलेल्या ठिकाणी आंदोलक महिला हातात आरतीचे ताट घेऊन पोचल्या. यावेळी महिलांनी मेंढरांना आरती केल्यानंतर पुरुष आंदोलकांनी भंडारा उधळून यळकोट यळकोट जयमल्हार, बिरुदेवाच्या नावानं चांगभल अशा घोषणा दिल्या. सरकार धनगर आरक्षणाबाबत चालढकल करत आहे. टिस संस्थेने अहवाल देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही असा यशवंत सेनेचा आरोप आहे. 

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने चार वर्षे या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. अभ्यासाच्या नावाखाली सरकारने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. धनगर समाजाच्या आरक्षणाची केंद्राकडे शिफारस करुन पाठपुरावा करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी असे भारत सोन्नर म्हणाले. यावेळी रणजित खांडेकर, अशोक भावले, श्री. तागड, लकडे रामचंद, अशोक लकडे, माणिक लकडे, अरुण भावले, मीरा लकडे, केशर भावले, विमल लकडे आदींचा सहभाग होता. 

सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. चार वर्षांपासून अभ्यासाच्या नावाखाली समाजाची दिशाभूल केली आहे. आता तरी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यशवंत सेनेचे भारत सोन्नर यांनी केली. 

संबंधित लेख