धनगर समाज आरक्षणाची वाट बिकट 

धनगर समाज आरक्षणाची वाट बिकट 

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाची पुढील वाट बिकट आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी)दर्जा देण्याबाबतचा टाटा सामाजिक संस्थेचा अभ्यास अहवाल राज्य सरकारला सुपूर्द केला असून सरकार धनगर आरक्षणाबाबत वेळ काढूपणा करीत असल्याचा आरोप धनगर आरक्षणाबाबत संघर्ष करणाऱ्या संघटनांनी केला आहे. 

यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. याबाबत धनगर आरक्षण संघटनांनी सरकारच्या विरोधात उतरून जोरदार आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. 

धनगर आरक्षण प्रक्रियेचा वैधानिक प्रवास 
टाटा सामाजिक संस्थेचा अभ्यास अहवाल सरकारला सादर करणे. त्यानंतर तो अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर करणे. नंतर राज्याच्या आदिवासी विभागामार्फत केंद्रीय आदिवासी विकास संस्थेकडे पाठवणे. नंतर भारतीय जनगणना आयुक्‍त यांच्याकडे तेथून केंद्राच्या एससी,एसटी विभागाकडे. तेथून संसंदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करणे. नंतर राष्ट्रपती कार्यालयाकडे सहीसाठी. सही झाल्यनंतर राष्ट्रपतींनी पारित केलेल्या 10ऑक्‍टोंबर 1950 च्या सुचीमध्ये नोंद झाल्यानंतर हे आरक्षण मिळणार आहे. 

धनगर समाजाचे अभ्यासक संतोष आखाडे म्हणाले, की टाटा सामाजिक संस्थेकडे आरक्षणाबाबत अभ्यास करण्याची गरज नव्हती. वेळकाढूपणा आहे. सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दोन वर्षे लागतात. या सरकारचा कालावधी वर्षभरात संपणार आहे. 

सराकरला सळो की पळो करणार- नवनाथ पडळकर 
राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय आणून त्यावर ताबडतोब पाउले उचलली नाही तर येत्या अधिवेशनादरम्यान सरकारला जाब विचार असून सरकारला सळो की पळो करणार असल्याचे प्रतिक्रीय यशवंत क्रांती सेनेचे अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com