Dhangar community workers worship ST Bus during road block | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

रास्ता रोको दरम्यान एसटी बसची धनगर समाजाकडून पूजा

प्रशांत बारसिंग. 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

जामखेड फाटा येथे धनगर समाजाने त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करताना रस्त्यात आलेल्या एसटी बसची पूजा करुन तिला विनाअडथळा पुढे जाऊ दिले.

मुंबई : " जामखेड फाटा येथे धनगर समाजाने त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करताना रस्त्यात आलेल्या एसटी बसची पूजा करुन तिला विनाअडथळा पुढे जाऊ दिले. आंदोलन करताना सर्वसामान्य जनतेच्या सार्वजनिक वाहतुकीचा आदर करण्याची आंदोलकांची ही कृती आदर्शवत असून याबद्दल आपण आंदोलकांचे आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो," अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

" आज जामखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करताना आलेल्या एसटी बसची आंदोलकांनी पूजा केली. एवढेच नव्हे तर आंदोलकांनी चालक आणि वाहकाचा सत्कार केला. गोरगरीब आणि सर्वसामान्य लोक वापरत असलेल्या सार्वजनिक वाहतुकीबद्दल आंदोलकांनी व्यक्त केलेला हा आदर फार महत्वाचा आहे. धनगर समाज बांधवांनी आजच्या आपल्या कृतीतून आंदोलनासंदर्भात वेगळा आदर्श घालून दिला आहे," अशी प्रतिक्रीया रावते यांनी दिली.

संबंधित लेख