dhangar agitation in satara | Sarkarnama

#DhangarReservation साताऱ्यात धरणे आंदोलन 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. 

सातारा : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. 

गेली अनेक वर्षे समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजातील विविध संघटनांकडून सातत्याने आंदोलने होत आहेत. आजही शासन त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे हे बेमुदत धरणे आंदोलन सुरु केल्याचे समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तातडीने समाजाला आरक्षण लागू करावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या आंदोलनात बाळासाहेब माने, विकास कोकरे, रविंद्र काळे, विशाल कोकरे, दिपक अवकिरे, ओंकार कोकरे, जयराम काळे, नितीन खरात आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख