dhananjay munde visited draught affected area | Sarkarnama

धनंजय मुंडे दुष्काळी पाहणीसाठी परळी, अंबाजोगाईतील शेत बांधावर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

धनंजय मुंडे यांनी सहा दिवस मतदारसंघातील दुष्काळाची पाहणी करणार आहेत. मंगळवारी त्यांनी परळी मतदार संघातील व अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर भागातील शेत - बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बीड : एकिकडे दिवाळीची धामधुम असताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे दुष्काळी पाहणीसाठी शेत बांधावर गेले. माझ्यासाठी दिवाळीच्या सणापेक्षा शेतकऱ्यांसोबत असलेले दुष्काळी संकट महत्वाचे आहे. म्हणुनच मी दिवाळी साजरी न करता तुमच्या व्यथा जाणुन घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगीतले. 

मंगळवारी त्यांनी परळी मतदार संघातील आणि अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर व राडी परिसरातील शेतांमध्ये जाऊन दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. सरकार शेतकरी विरोधी असल्याने आपल्याला निसर्गा सोबतच सरकारशीही दोन हात करावे लागणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. जनावरांना दावणीला चारा देण्याऐवजी त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचा सरकारचा निर्णय तुघलकी असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. 

गोविंद देशमुख, रणजित लोमटे, राजाभाऊ औताडे, विलास मोरे, शिवहार भताने, तानाजी देशमुख, सुधाकर शिनगारे, समीर पटेल, गणेश देशमुख त्यांच्या सोबत होते.

संबंधित लेख