dhananjay munde attack on narendra modi | Sarkarnama

इम्रान खान यांच्यापेक्षाही जास्त वेगात मोदी 'फेकतात'; मुंडे घसरले! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

सांगली : जगातला सर्वांत वेगवान चेंडू फेकणारा पंतप्रधान पाकिस्तानला लाभला आहे तर आम्हाला सर्वात जास्त "फेकणारा' पंतप्रधान लाभला आहे, अशी जोरदार टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज येथे केली. 

सांगलीवाडीत आज रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारवर टिकेचे आसूड ओढताना श्री मुंडे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 

ते म्हणाले," जगातील वेगवान गोलंदाज पाकिस्तानचा पंतप्रधान होणार असल्याचे एका पाकिस्तानी पत्रकाराने लिहले आहे. पण मी सांगतो जेवढ्या वेगात इम्रान खान चेंडू फेकत नसतील तेवढ्या वेगात आमचे पंतप्रधान फेकतात. त्यांची बरोबरी तुमचे इम्रान खान करू शकणार नाहीत. इतक्‍या फेकू सरकारला, त्यांच्या पक्षाला आपण मत देणार आहात का?'' 

संबंधित लेख