dhananjay munde about ncp's gharwapsi programme | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्यांची 12 डिसेंबरनंतर घरवापसी!

भारत नागणे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

लाटेत निवडून आलेल्या सरकारमधील आमदार आणि खासदार पुन्हा सभागृहात दिसणार नाहीत.

पंढरपूर : लाटेत निवडून आलेले सरकार फार काळ टीकत नाही असा पूर्व इतिहास आहे. त्यामुळेच जनतेचा विश्वास गमावलेल्या   भाजप शिवसेनेचे आमदार-  खासदार पुन्हा सभागृहात दिसणार नाही, असा दावा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज पंढरपुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला.

खासदार शरद पवार यांच्या वाढदिनाच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळाव्यासाठी मुंडे आले होते. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. मुंडे म्हणाले, खोटी आश्वासने देऊन देशात आणि राज्यात भाजपने सत्ता मिळवली. पाच वर्षात फक्त सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला. लाटेत निवडून आलेल्या सरकारमधील आमदार आणि खासदार पुन्हा सभागृहात दिसणार नाहीत. त्यामुळे येत्या 12 डिसेंबर नंतर  राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या नेत्यांची घरवापसी सुरु झालेली दिसून येईल असेही यावेळी मुंडे यांनी  स्पष्ट केले. 

यावेळी आमदार भारत भालके, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते, शहर अध्यक्ष संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, राजूबापू पाटील,सुभाष भोसले, अमोल नागटिळक ,सूरज पेंडाल आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख