dhananjay mahadik questions satej patil about corporation | Sarkarnama

सतेज पाटील महापालिकेत गुप्त मतदान घेवून दाखवतील काय? 

सुनिल पाटील 
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

कोल्हापूर: गोकुळमध्ये हात वर करून ठराव घेण्याऐवजी गुप्त मतदान घेणाऱ्यांनी महापालिकेतही गुप्त मतदान घेण्याचे धाडस दाखवावे, असे जाहीर आव्हान खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना दिले. 

कोल्हापूर: गोकुळमध्ये हात वर करून ठराव घेण्याऐवजी गुप्त मतदान घेणाऱ्यांनी महापालिकेतही गुप्त मतदान घेण्याचे धाडस दाखवावे, असे जाहीर आव्हान खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना दिले. 

जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघांची (गोकुळ) वार्षिक सभा रविवारी (ता. 30) होणार आहे. या सभेत जिल्हा दूध संघ असलेला गोकूळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा ठराव मांडला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, गोकुळच्या सत्तारूढ संचालकांनी गोकुळच्या ताराबाई पार्क येथे बैठक घेवून नियोजन कसे असेल याची माहिती दिली. यावेळी महाडिक यांनी श्री पाटील यांना हा टोला लगावला. 

आमदार सतेज पाटील यांनी गुप्त मतदान घेवूनच ठराव मंजूर किंवा नामंजूर करावा. लोक दडपशाहीला घाबरून लेखी ठराव देत आहेत, असे आरोप सत्ताधाऱ्यांवर केले होते.आजच्या बैठकीत हाच धागा पकडून गुप्त मतदान कशासाठी घ्यायचे. सर्वच ठिकाणी आपण गुप्त मतदान घेतो का? जर गुप्त मतदान घ्यायचे असेल तर ते महानगरपालिकेत घेवून दाखवा, असे आव्हान महाडिक यांनी दिले. 

संबंधित लेख