धनंजय सुर्वे यांनी  प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारले  

दोनदा नगरसेवकपद भूषवणारे अंबरनाथचे माजी नगरसेवक तसेच रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्त्व धनंजय सुर्वे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे.
 धनंजय सुर्वे यांनी  प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारले  

उल्हासनगर : दोनदा नगरसेवकपद भूषवणारे अंबरनाथचे माजी नगरसेवक तसेच रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्त्व धनंजय सुर्वे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे.त्यामुळे भारीपचा एकही नगरसेवक नसलेल्या अंबरनाथच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली असून येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारीपचे खाते उघडण्याची आणि विधानसभेत तगड्या आव्हानाची शक्यता निर्माण झाली आहे.

उल्हासनगरात राहणारे भारिप बहूजन महासंघाचे नेते सारंग थोरात यांच्या उपस्थितीत धनंजय सुर्वे यांनी भारिपमध्ये रितसर प्रवेश केला आहे.सुर्वे यांची अंबरनाथ मधील लोकप्रियता,ते शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर या सामाजिक संघटनेच्या बांधिलकीतून राबवत असलेले कार्यक्रम पाहता सुर्वे यांची एंट्री ही पक्षासाठी गतिमान-बळकटी देणारी ठरणार असे स्पस्ट चित्र दिसू लागले आहे.

एकेकाळी ज्यांचा दबदबा होता ते रामदास आठवले गटाचे अंबरनाथ मधील सर्वेसर्वा नरेश गायकवाड यांच्या सोबत राहताना धनंजय सुर्वे यांचेही शहरात नावलौकिक झाले.सुर्वे प्रथम आठवले गटाचे नगरसेवक होते.  दुसऱयांदा त्यांना नगरसेवक पद लाभले होते  . मागच्या निवडणुकीत त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला . पण त्यांनी  सामाजिक संघटना स्थापन करून त्याद्वारे विविध कार्यक्रम राबविले .  पुन्हा राजकारणात दमदार एन्ट्री करण्यासाठी त्यांनी  "वेट अँड वॉच"करण्याचेधोरण स्वीकारले होते . 

 एकेकाळी सर्वप्रथम रामदास आठवले यांच्या गटाचे नगरसेवक व खंदे समर्थक असणारे धनंजय सुर्वे यांनी भारिप बहूजन महासंघात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राजकारणातील स्वच्छ प्रतिमा अशी ओळख निर्माण करणारे व भारिप बहूजन महासंघाला वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे वास्तुविशारद सारंग थोरात यांच्या पुढाकाराने  हा प्रवेश झाला  आहे . महाराष्ट्र प्रदेश सम्यक विद्यार्थी आंदोलन परिषदचे अध्यक्ष महेश भरती,कार्यालयीन सचिव रतन बनसोडे,ठाणे जिल्ह्याचे सहनिरीक्षक सुरेंद्र बनसोडे,अंबरनाथचे माजी अध्यक्ष अविनाश गाडे यांच्या उपस्थितीत धनंजय सुर्वे यांनी भारिपमध्ये प्रवेश केला.

भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत समाजातील अनेक घटक जुळले असून जुळण्याचा ओघ सुरूच आहे. त्याअनुषंगाने लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्या विक्रमी जाहीर महासभेचे आयोजन अंबरनाथ-उल्हासनगरात केले जाणार असल्याची माहिती सारंग थोरात,धनंजय सुर्वे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com