तर मुख्यमंत्र्यांना नगर जिल्ह्यात फिरकू देणार नाही - धनंजय मुंडे

तर मुख्यमंत्र्यांना नगर जिल्ह्यात फिरकू देणार नाही.- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
dhananjay_munde
dhananjay_munde

नगर :" आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने षडयंत्र रचून आमदार संग्राम जगताप यांना गुन्ह्यात गोवले आहे. शिवसेना पोलिसांच्या माध्यमातून राजकारणाचा कुटील डाव टाकत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना अटक करतात, पण शिवसेनेचे नेते मोकळे कसे. संबंधितांना अटक केली नाही, तर मुख्यमंत्र्यांना नगर जिल्ह्यात फिरकू देणार नाही," असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

मुंडे यांनी आज (कै.) कैलास गुरवले यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तत्पूर्वी बोलताना त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले,''शिवसेनेच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. शहरात २५ वर्षे सत्ता उपभोगली. पण त्यांना शहरात काही करता आले नाही. त्यांचा पराभव २५ वर्षांच्या राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांनी करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळे हतबल झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना अडकविण्याचे षडयंत्र केले आहे. पोलिसांच्या मदतीने हे काम सुरू आहे. "   "

पोलिस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड ज्यांनी केली असेल, त्यांच्यावर खुशाल कारवाई करा. पण केडगाव येथेही पोलिसांच्या गाड्यांवर दगफेक करणाऱ्यांना मोकळे का सोडता. गाड्यांची नासधूस, रास्ता रोको करून मृतदेहाची विटंबणा करणाऱ्या शिवसेनेच्या त्या ६०० कार्यकर्त्यांना का अटक होत नाही. याबाबत आपण शासनाकडे मागणी करणार असून, त्यांना अटक केली नाही, तर मुख्यमंत्र्यांना नगर जिल्ह्यात फिरकू देणार नाही. गिरवले यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू," असे ते म्हणाले.

पोलिस अधीक्षकांची भेट

धनंजय मुंडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन गिरवले यांच्या मृत्यूची चाैकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com