Dhanajay Munde presents cell phone used by Abu Salem | Sarkarnama

अबू सालेमने वापलेला फोन धनंजय  मुंडेंनी आणला  सभागृहात 

सरकारनामा  न्यूज ब्युरो 
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई  :  देशद्रोही आणि सराईत गुन्हेगार म्हणून ओळखल्या जाणारा अबू सालेम याने  कारागृहात वापरलेला मोबाईल फोन  विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात आणून एकच खळबळ उडवून दिली. 

मुंबई  :  देशद्रोही आणि सराईत गुन्हेगार म्हणून ओळखल्या जाणारा अबू सालेम याने  कारागृहात वापरलेला मोबाईल फोन  विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात आणून एकच खळबळ उडवून दिली. 

कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन  अबू सालेम हा कारागृहात हा फोन वापरत होता.  त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेची कुठे व्यवस्था आहे? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. हा फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासून घ्या, त्यासाठी मी कुठल्याही चौकशीला तयार असल्याचेही मुंडे यांनी आव्हान दिले .  या मोबाईलची चौकशी करावी अशी मागणी करत अबू सालेम वापरत असलेला मोबाईल सभापतींकडे देत असल्याचे धनंजय मुंडे यांनी  स्पष्ट केले.

"या सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात नऊ  अधिवेशने झाली, त्यातील प्रत्येक अधिवेशनात या सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे  दिले पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही, त्यामुळे सरकारला जर पारदर्शक भ्रष्टाचार करायचा असेल तर करावा पण,  ज्या जनतेनी तुम्हाला सत्तेवर आणून तीच जनता तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही, " असे संतप्त उद्गार विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेची सुरुवात करताना काढले.

मंत्र्यानी काहीही भ्रष्टाचार केला तर त्यांना क्लीनचिट दिली जातेय, त्यामुळे मंत्र्याच्या क्लीन चिट  देण्याची  सरकारने  फॅक्टरी काढली आहे. या फॅक्टरीतुन मंत्र्यानी काहीही भ्रष्टाचार केला की त्यांच्या क्लीनचिटची पावती बाहेर येत आहे.  या सरकारमध्ये हा पारदर्शक भ्रष्टाचार आणि याला केवळ मुख्यमंत्रीच नाही तर तपास यंत्रणा, चौकशी यंत्रणाही पाठीशी घालत आहेत ,असा आरोप करत मुंडे यांनी आता सरकारने कोणावर कारवाई करायची नसेल तर भ्रष्टाचार  लीगल करून टाकावा,अशी उपरोधिक मागणी केली.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलेल्या जमीन घोटाळ्याची माहिती दिशाभूल करणारी दिली, तर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनाही सरकार वाचवत आहे. ओंकार बिल्डरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी लाखो रुपये माध्यमांपुढे आणले तरी सरकार कारवाई का करत नाही, हा बिल्डर सरकारचा जावई आहे काय असा सवालही मुंडे यांनी केला.

 

 

संबंधित लेख