Dhanajay Munde meets mother after a long time | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

आईची माया : धनू  जेवलास का ? तब्येतीला सांभाळ !

तुषार खरात : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंडे  दौ-यावर जाणार असतील तर आठ - दहा दिवसांसाठीच्या दशमा देतात. जवळपास दररोजच त्या मुंडे यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात. धनू जेवलास का ?, तब्येतीला सांभाळ अशा विचारपूस करतात.

मुंबई : हल्लाबोल यात्रेचा झंझावात, सभा - भाषणांना जनतेकडून मिळणारा मोठा प्रतिसाद, विधीमंडळ अधिवेशनात झालेले उलटसूलट आरोप, मध्येच खालावलेली तब्येत अशा कटू गोड आठवणींचा सामना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना गेल्या दोन महिन्यांत करावा लागला.

 दोन महिन्यांच्या धावपळीनंतर पहिल्यांदाच मुंडे आपल्या घरी परतले. मुंडे यांच्या या निवांत क्षणी त्यांच्या मातोश्री रूक्मिणी मुंडे यांनी आपल्या लेकराला ओवाळून त्यांना आशिर्वाद दिले. यावेळी कौतुकाने आणि काळजीने त्यांच्या आईचे डोळे भरून आले होते. मुंडे यांनी आईच्या पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेतले.

कै. पंडितअण्णा मुंडे यांच्यानंतर परळीच्या घरी रूक्मिणी मुंडे एकट्याच असतात. धनंजय मुंडे सतत राज्यभरात दौ-यावर असतात. मतदारसंघात असल्यानंतर रूक्मिणी यांच्या नजरेसमोर मुंडे असतात. पण अशा वेळा फारच कमी येतात.

एक - दोन अपवाद वगळता धनंजय मुंडे यांना सलग दोन महिने घरी जाता आले नव्हते. या दोन महिन्यांत त्यांनी सत्ताधारी पक्षावर आपल्या वक्तृत्वाने  हल्ले केले. मुंडे यांचे हे कर्तृत्व रूक्मिणी यांनी दूरचित्रवाणी व वृत्तपत्रांतून पाहिले. पण दुस-या बाजूला अधिवेशन काळात त्यांच्यावर गंभीर आरोपही झाले. गेल्या आठवड्यात ते आजारी असल्याच्याही बातम्या आल्या.

 त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांच्या मातोश्रींनी त्यांना ओळावून औक्षण केले.मुंडे यांच्यावर त्यांच्या आईचा प्रचंड जीव आहे. घरातून बाहेर पडताना त्या नियमितपणे जेवणाचा डबा देतात. मुंडे  दौ-यावर जाणार असतील तर आठ - दहा दिवसांसाठीच्या दशमा देतात. जवळपास दररोजच त्या मुंडे यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात. धनू जेवलास का ?, तब्येतीला सांभाळ अशा विचारपूस करतात. पंधरवड्यापूर्वीच मुंडे आपल्या बहिणीकडे जावून आले होते. त्यानंतर आज आईचे त्यांनी आशिर्वाद घेतले . 

संबंधित लेख