Dhanajay Mahadik attacks on Sanjay Mandlik | Sarkarnama

जे शुध्दीवरच नसतात त्यांची दखल कशाला ? धनंजय महाडिकांचा मंडलिकांवर वार  

सदानंद पाटील 
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

महाडिक आणि कंपनीला जिल्ह्यातून हददपार करण्याचे वक्‍तव्य प्रा.मंडलिक यांनी केले होते. या वक्‍तव्याचा खासदार महाडिक यांनी खरपूस समाचार घेतला.

कोल्हापूर : " सकाळी बारा  वाजता उठणारे व संध्याकाळी सात नंतर नॉट रिचेबल असणाऱ्यांना कोल्हापुरचे लोक स्वीकारतील का?  जे शुध्दीवरच नसतात, त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही ," असा  टोला राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा.संजय मंडलिक यांना लावला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

महाडिक आणि कंपनीला जिल्ह्यातून हददपार करण्याचे वक्‍तव्य प्रा.मंडलिक यांनी केले होते. या वक्‍तव्याचा खासदार महाडिक यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, " माझे वडील खासदार, आमदार होते म्हणून मुलाने खासदार, आमदार होण्याचे दिवस आता गेले. खासदार, आमदार होण्यासाठी प्रत्येकाला आपले कर्तूत्व सिध्द करावे लागते. कोल्हापुरचे लोक सुज्ञ आहेत. ते योग्य निर्णय घेतात. तसेही, यांच्या घरात 25 वर्षे सत्ता होती. मग पुन्हा यांनाही कशासाठी सत्तेची हाव आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. " 

हददपार करण्याची ही काय भाषा झाली का?  असा प्रश्‍न करत खासदार महाडिक म्हणाले, " महाडिकांना हददपार करणार असे विरोधक म्हणत असताना  आमच्या घरात आमदार झाले, खासदार झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यामुळे अशी भाषा करणे योग्य नाही. त्यांचे बोलणे चुकीचे आहे. याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही ."  
 

संबंधित लेख