dhairyasheel mane about sharad pawar | Sarkarnama

शरद पवारांनी दहा वर्षे ZP त संधी दिली, त्यामुळे मी खाल्ल्या घरचे वासे मोजणार नाही!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

उद्धव ठाकरेंनी माझी उमेदवारी घोषीत करून बहुजन समाजाचे नेतृत्व करणाची संधी दिली

रुकडी (कोल्हापूर): 'शरद पवारांनी दहा वर्षे जिल्हा परिषदेत संधी दिली त्यामूळे मी खाल्ल्या घरचे वासे मोजणार नाही', अशा शब्दांत नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले युवा नेते धैर्यशील माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते रुकडी (ता. हातकणंगले) येथे शिवसैनिक, माने गट व ग्रामस्थांच्य वतीने आयोजित रॅलीनंतर आयोजित बैठकित बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते.

धैर्यशील माने म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माझी उमेदवारी घोषीत करून बहुजन समाजाचे नेतृत्व करणाची संधी दिली. माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवेन. शरद पवारांनी दहा वर्षे जिल्हा परिषदेत संधी दिली, त्यामुळे मी खाल्ल्या घरचे वासे मोजणार नाही. 

यावेळी साताप्पा भवन, संग्रामसिंह कुपेकर, मिलिंद नार्वेकर, सरपंच रफिक कलावंत, उपसरंपच शितल खोत व शिवसैनिक उपस्थित होते. 

संबंधित लेख