'एसीबी'चे महासंचालक पद वर्षभरापासून रिक्त 

maharastra-police-
maharastra-police-

मुंबई   :  वरिष्ठ आयपीएस अधिकारी सतीश माथूर यांची राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे(एसीबी) महासंचालक पद रिक्त झाले होते. या घटनेला वर्षभराहून अधिक कालावधी उलटला, तरी रिक्त जागेवर अद्याप कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. 

महासंचालक माथूर यांनी एप्रिलमध्ये गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांना पत्राद्वारे हे पद भरण्याची विनंती केली होती. 

31 जून 2016 पासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील महासंचालक पद रिक्त आहे. या पदाच्या अधिकाऱ्याची पोलिस  आस्थापना मंडळाच्या समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली. त्यामुळे हे पद अधिक काळ रिक्त ठेवल्याने भविष्यात कायदेशीर बाबी उद्भवण्याची शक्‍यता माथूर यांनी त्यांच्या पत्रात व्यक्त केली होती. 

याशिवाय पोलिस महासंचालक पदावर पदोन्नतीसाठी अपर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी उपलब्ध आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव सरकारला 27 डिसेंबर 2016 ला पाठवण्यात आला आहे, असे सांगत माथूर यांनी हे पद भरण्याची विनंती श्रीवास्तव यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. 

राकेश मारिया, प्रभात रंजन यांसारखे अधिकारी निवृत्त झाले. प्रतिनियुक्तीवर दिल्लीला गेलेल्या मीरा बोरवणकर यांची निवृत्तीही जवळ आली आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बढती दिल्याशिवाय महासंचालक दर्जाच्या अनेक जागा भरता येणार नाहीत.

 विशेष करून राज्य पोलिस महासंचालकानंतर महत्त्वाचे मानले जाणारे एसीबीतील महासंचालक पद तत्काळ भरणे आवश्‍यक आहे. कारण, आयपीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करणाऱ्या आस्थापना मंडळाच्या पाच सदस्यांत एसीबीचे महासंचालकही सदस्य असतात, असेही माथूर यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com