devendra phadnvis talk on samrudhi highway | Sarkarnama

समृद्धी महामार्गाला कुठेही विरोध नाही - देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

कोरियाने तेथील सेऊल व भूचान या शहरात पाचशे किमीचा एक्‍स्प्रेस वे तयार केला. या कंपन्यांनीही महाराष्ट्रात येऊन एसपीव्ही स्थापन करण्यासंदर्भात चर्चा केली. एवढेच नव्हे सिंगापूर येथील वित्त परिषदेसोबतही चर्चा झाली असून ते महाराष्ट्रात गुंतवणुकीस तयार आहे. सिंगापूर येथील चांगी विमानतळ कंपनीशी नागपूर व पुणे विमानतळ विकासासाठी करार झाला.

नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जनतेला विश्‍वासात घेऊनच पूर्ण केला जात आहे. समृद्धी महामार्गासाठी कुठेही विरोध नाही, याला विरोध कुठे आहे असा सवालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात काल केला. महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडा दाखवला. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. 

मुख्यमंत्री कोरिया, सिंगापूर दौरा आटोपून परतल्यावर ते काल नागपुरात पत्रकारपरिषदेत बोलत होते. समृद्धी मार्गासाठी कोरिया कर्ज देणार आहे. या मार्गासाठी कोरियाच्या दोन कंपनी आणि एमएसआरडीसी मिळून एक स्पेशल परपज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासंदर्भात कोरियांच्या उपपंतप्रधानांना 'ऑफर' दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या मार्गासाठी कुठेही विरोध नाही, लोकांना विश्‍वास घेऊनच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 

कोरियाने तेथील सेऊल व भूचान या शहरात पाचशे किमीचा एक्‍स्प्रेस वे तयार केला. या कंपन्यांनीही महाराष्ट्रात येऊन एसपीव्ही स्थापन करण्यासंदर्भात चर्चा केली. एवढेच नव्हे सिंगापूर येथील वित्त परिषदेसोबतही चर्चा झाली असून ते महाराष्ट्रात गुंतवणुकीस तयार आहे. सिंगापूर येथील चांगी विमानतळ कंपनीशी नागपूर व पुणे विमानतळ विकासासाठी करार झाला. पुणे येथील विमानतळासाठी चांगी विमानतळाचे तंत्रज्ञ काम करतील व एसपीव्ही स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपुरातील नागपूर महानगर विकास प्राधीकरणाला एक-दोन दिवसांत मंजुरी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

फूट ओव्हर ब्रिज आता रेल्वे सेफ्टीमध्ये 
रेल्वे खात्यात फुट ओव्हर ब्रिज हे पायाभूत सुविधांमध्ये होते. रेल्वे सुरक्षेच्या नियमात नव्हते. आता मात्र कालच्या घटनेनंतर फूट ओव्हर ब्रिजही रेल्वे सेफ्टीअंतर्गत अंतर्भूत करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी तत्काळ घेतला, असे फडणवीस यांनी सांगितले. 

संबंधित लेख