devendra phadanvis and martha kranti morcha | Sarkarnama

आंदोलन चिघळल्याने मुख्यमंत्र्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना आनंद

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणी वरुण आंदोलन चिघाळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील भाजपा नेते आणि मंत्र्यांच्या मनात उकळया फुटू लागल्याची चर्चा आहे. राज्याच्या कारभाराचा गाड़ा हाकताना मुख्यमंत्री आम्हाला किम्मत देत नाहीत, आम्हाला गृहीत धरत नाहीत, प्रत्येक निर्णयाचे श्रेय स्वतःच घेतात. एखाद्या खात्याचा चांगला निर्णय झाला तरी त्या मंत्र्यांची कुठेही छबी उमटे नये याची दक्षता घेतात, अशा संशयाने अनेक मंत्री चार वर्षापासून नाराज आहेत. 

मंत्रिमंडळात सुरुवातीला एकनाथ खडसे आणि आता चंद्रकांत दादा पाटील यांचीच नावे चर्चेत आहेत. अन्य मंत्री चर्चेपासुन दूर असतात, अशी खंत खाजगीत बोलताना मंत्री व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री विरोधी नेतेही हीच भावना व्यक्त करत आहेत. त्यातच मराठा आंदोलन हाताळताना मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील हे दोघेच चर्चेत आहेत, कुणाही मंत्र्यांने आंदोलन शांत होण्यासाठी प्रयत्न केले नाही, किंवा आवाहनही केले नाही. मराठा आंदोलन शांत करण्यासाठी फडणवीस यांनी भाजपच्या कुठल्याही मंत्री किंवा नेत्याला सोबत न घेता नारायण राणे यांना सोबत घेतल्याची बाब अनेकांना आवडली नाही, त्यामुळे आंदोलन चिघळून मुख्यमंत्री अडचणीत यावेत, असे अनेकांना वाटत असल्याची चर्चा आहे. 
 
संबंधित लेख