Devendra Fasdnavis Challenges opposition leaders | Sarkarnama

मुख्यमंत्र्याचे विराेधकांना ओपन चॅलेंज : नाशिकवरून  नागपूरला पळविलेला एक तरी  प्रकल्प सांगा

संपत देवगिरे
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

परिवहन सेवेसाठी 400 बस घेणार असून 200 ईलेक्ट्रीकल आणि 200 सीएनजी वर बस आण्याचे नियाेजन आहे.मेट्राेची फिजिबिलिटी तपासून पाहिली जात आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटेलाईट टाऊनशीप म्हणून विकास करण्याचं नियोजन सुरू आहे.

नाशिक : " दत्तक घेतलेल्या नाशिककडे माझे  दुर्लक्ष  झालेले नाही. नाशिकवर अन्याय हाेत असल्याचा आराेप चुकीचा आहे.  माझे खुले आव्हान आहे, नाशिकचा असा एक प्रकल्प सांगा की ,जाे मी नागपूरला पळविला आहे,"अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विराेधकांना आव्हान दिले.

नाशिकला विकास आढावा बैठकीसाठी ते नाशिकला आले हाेते. पालकमंत्री गिरीश महाजन, गृह राज्य मंत्री रणजित पाटील, हेही उपस्थित हाेते. 

श्री फडणवीस म्हणाले की, "दत्तक घेतलेल्या नाशिकच्या विकासाकडे कुठलेही  दुर्लक्ष   झालेले नाही.  मी नाशिक दत्तक घेताे अस म्हटलं तर तुम्ही (पत्रकार) सगळ्या बाकी गाेष्टी माझ्या माथी मारायला निघाले आहात .  पण माझी त्यालाही हरकत नाही. पण हे लक्षात घ्या की, कुठलाही प्रकल्प करायचा तर त्याला ठराविक असा कालावधी लागताे. त्याचे विशिष्ट् आयुष्य असते. हा कालावधी लागणारच हे लक्षात घेतले जात नाही."

दत्तक नाशिकवर लक्ष असल्याचे सांगताना आज मुख्यमंंत्र्यांनी विविध घाेषणा केल्या. त्यात,स्मार्ट  सिटीच्या कामाला गती दिल्याचे सांगितले. शहरात बससेवा सुरू केली जाईल.सध्याची बससेवा ही तोट्यातच चालते. मात्र नागरिकांना सुविधा मिळणं महत्वाचं. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या नाशिकच्या भेटीत सर्वच यंत्रणांच्या अधिका-यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. 

यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांसह विविध अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित लेख