devendra fadnvis avoids brahman stage | Sarkarnama

`देवेंद्र फडणवीस ब्राह्मणांच्या व्यासपीठावर येण्याचे टाळतात`

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 डिसेंबर 2018

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्यणांच्या व्यासपीठावर येण्याचे टाळतात. ते ब्राह्मणांशी `असोसिएट` होऊ इच्छित नाही, अशी टीका बहुभाषिक ब्राह्यण संघाचे दिलीप अलोणी यांनी केली.

ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा काही ब्राह्मण संघटनांनी उपस्थित केला. त्यावर एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चेत हा मुद्दा मांडण्यात आला. फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाच्या अनेक कार्यक्रमांना निमंत्रित केले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार अलोणी यांनी केली.

ते म्हणाले की मराठा सेवा संघाचे पुरूषोत्तम खेडेकर यांनी ब्राह्मणांच्या विरोधात अनेक पुस्तके लिहिली. संभाजी ब्रिगेड असाच अपप्रचार करत आहेत. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा लोकोत्तर पुरूषांचा अवमान केला जात आहे. त्यांची हेटाळणी करत आहेत. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. सरकारला आम्ही अनेकदा निवेदन दिली. पण संबंधितांवर कारवाई केली जात नाही.

ब्राह्मण समाजाला भारतीय जनता पक्ष गृहित धरून चालला आहे. ब्राह्मणांनीही भाजपलाच मत दिले पाहिजे, असे आता समजण्याचे कारण नाही. जो पक्ष आपल्या समाजाचा विचार करेल अशाच पक्षाला ब्राह्मणांनी मते दिली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

या चर्चेत इतर ब्राह्मण अभ्यासकांनी समाजाने बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली. भिक्षुकी करणाऱ्यांना आरक्षणाची मागणी या चर्चेत करण्यात आली. तसेच अनेकजण हे केवळ स्वतःपुरते पाहतात. समाज म्हणून एकत्र येत नाहीत. समाजाची ताकद दाखविल्याशिवाय राजकीय नेत्यांना आपले महत्त्व कळणार नसल्याचाही मुद्दा चर्चेत उपस्थित झाला.

संबंधित लेख