devendra fadnavice | Sarkarnama

पोलिस वसाहतींनाही अच्छे दिन येणार

संदीप खांडगेपाटील : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखविले होते. मोदींच्या शब्दांची पूर्तता करण्यासाठी फडणवीस सरकारने एकामागोमाग एक लोकोपयोगी निर्णय घेत त्या निर्णयाची अंमलबजावणीसही प्रारंभ केला आहे. मुंबईतील बीडीडी चाळींपाठोपाठ आता दुरवस्थेत अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या पोलिस वसाहतींनाही लवकरच अच्छे दिन येणार आहे. 

70 वर्षापासून प्रलंबित राहिलेला मुंबईतील बीडीडी चाळीचा प्रश्‍न नुकताच निकाली निघाला असून तेथील लोकांना टॉवरमध्ये तब्बल 500 स्क्वेअर फुटाची जागा वापरावयास मिळणार आहे. मुंबईत गेल्या अनेक वर्षापासून पोलिस वसाहतींची दुरवस्था झाली असून त्या धोकादायक अवस्थेमधील इमारतींमध्ये पोलिस आपला संसार थाटून आहेत. राज्यात सत्तेवर आल्यावर गृहमंत्रिपदाचाही गाढा हाकणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्याचा मानस जाहीररीत्या भाषणातूनही व्यक्त केला आहे. 

संबंधित लेख