'साकळाई'चा शब्द देण्यासाठी पुन्हा नगरला आलोय! 

पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांचा विजयाची खात्री झाली.
'साकळाई'चा शब्द देण्यासाठी पुन्हा नगरला आलोय! 

नगर  : तुमच्या मनातील बोलण्यासाठी आलो आहे. 25 वर्षे रखडलेले प्रश्‍न चार वर्षात सोडविले. इथं कोणालाही पोपटंची करू द्या. काही झालं तरी साकळाईचे काम करणार. ज्यांनी दहा वर्षात साठवण तलाव केला नाही. ते काय काय साकळाई योजना करणार, अशी टीका करून विधानसभेच्या आधी योजनेच्या आरखाड्याला मान्यता देणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

नगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ वाकळी (ता. नगर) येथे ते विजय संकल्प सभेत बोलत होते. या वेळी पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, खासदार दिलीप गांधी, डॉ. सुजय विखे, माजी आमदार बबन पाचपुते, शशिकांत गाडे, बाळासाहेब हराळ आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांचा विजयाची खात्री झाली. तरी केवळ साकळाईचा शब्द देण्यासाठी आलो आहे. नगर जिल्ह्यातील सिंचनाचा एकेक प्रश्‍न भाजप सरकारने सोडविला आहे. कुकडीला फेरशासकीय मान्यता देऊन तीन हजार कोटी रुपयांचा निधी दिला. विरोधकांकडून साकळाईसंदर्भात मनभेद करण्याचे काम सुरू आहे. इकडं येऊन म्हणायचं साकळाई झाली पाहिजे आणि तिकडे जावून म्हणायचं तुमच्या हक्काचं पाणी घेऊन चालले. मात्र, साकळाईमध्ये कोणाच्या हक्काची पाणी जाणार नाही. आपण उधारीचे काम करीत नाही. विधानसभेच्या निवडणुकी आधी योजनेच्या आरखाड्याला मान्यता देणार आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लागवला. 

भाषणाचा समारोप करताना पाचपुते यांचा गोंधळ उडाला. तेवीस तारखेला घड्याळासमोरील बटन दाबा, असे ते बोलून गेले. त्यामुळे उपस्थितांत हशा पिकला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पाचपुते हे शरद पवार यांचे खंदे समर्थक होते. पक्ष उभारणीच्या काळात त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळे त्यांच्या भाषणात अजुनही अनावधाने का होईना, परंतु घड्याळाचा उल्लेख होतो. नंतर त्यांनी पुन्हा दुरुस्ती करत कमळासमोरील बटन दाबण्याचे आवाहन केले. मात्र, हशा काही कमी झालाच नाही.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com