devendra fadavis meet narendar modi in dehli | Sarkarnama

दिल्ली गाठलेल्या फडणवीसांची माहिती मोदींनी गंभीरपणे ऐकली! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : महाराष्ट्रात उसळलेल्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी लगोलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांना दिली. 

फडणवीस यांनी मोदींची भेट घेऊन राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीची माहिती दिली. मराठा आरक्षणासाठी प्रस्तावित घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावरही पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्यात याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. निवडणुकीला जेमतेम वर्ष बाकी असतानाच तापलेल्या मराठा आंदोलनापाठोपाठ मुस्लिम व धनगर समाजांच्या आरक्षणाचा मुद्दाही तापू लागला आहे. राज्य सरकारचे 17 लाख कर्मचारी उद्यापासून (ता. 7) संपाचे हत्यार उपसणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा आजचा अचानक दिल्ली दौरा लक्षणीय मानला जातो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख