devendra fadanvise appeal to maratha community | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

 हिंसाचार करू नका; चर्चेला या ! मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

मुंबईः मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आजवर उचललेली पावले पारदर्शीपणे जनतेसमोर मांडत आंदोलकांना चर्चेचे निमंत्रण देणे, हे आंदोलन हाताळण्याचे सरकारचे सूत्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निकटच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली असून आजवर केलेले प्रयत्न प्रामाणिकपणे सांगणे हाच एकमेव मार्ग असल्याचा निर्णय झाला आहे. मुंबईत उद्या आयोजित केलेल्या बंद दरम्यान कोणताही हिंसाचार करू नका, असे आवाहन केले आहे. 

फडणवीस सरकारमधील क्रमांक दोनचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याच धर्तीवर बसगाड्या जाळून किंवा हिंसाचार करून आरक्षण मिळणार नाही, चर्चेला या, सरकार संवादास तयार असल्याचे विधान केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंद्रकांतदादांबरोबरच मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या सहकाऱ्यांशी आज चर्चा केली. 

गृहखात्याचे प्रमुख या नात्याने कायदा सुव्यवस्था परिस्थितीवर फडणवीस लक्ष ठेवून आहेत. 

आरक्षणाबाबत योग्य ती पावले उचलली जात असून, मराठा समाजाच्या स्थितीविषयीचे पाहणी अहवालही तयार होत आहेत. या संदर्भातील योग्य त्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. मागासवर्ग आयोगाने अभ्यास सुरू ठेवला असून, न्याय्य मागण्यांबाबत सरकार संवेदनशील आहे; मात्र प्रक्रियेला जो वेळ लागतो तो अपरिहार्य असतो हे लक्षात घेणे आवश्‍यक असल्याचे युवकांनी समजून घ्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सहकाऱ्यांशी बोलताना म्हटल्याचे समजते. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याने ते जनतेसमोर मांडणे हेच उचित असल्याचे मत चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडले असल्याचे समजते. 

संबंधित लेख