चुकलीरे भेट, ऐसी ताटातूट ! 

चुकलीरे भेट, ऐसी ताटातूट ! 

मुंबई : संत्रानगरीतील पावसाळी अधिवेशन ताजताजं संपवून मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ मुंबईला परतले अन्‌ लगेचच एक दिवस संपतो न संपतो तोपर्यत भाजपचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर बैठकांचे सत्र सुरू केले. 

तरूण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल जन्मदिवस होता. त्यामुळे त्यांना मित्र आणि पक्षाचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षातील मान्यंवर आदीनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या शुभेच्छा स्वीकारत असताना पंढरपूरी तिर्थस्थळी आषाढी एकादशी वारीला सहपत्निक शासकीय महापुजेला जाण्याच्या आठवणिने देवेनभाऊ सात्विक सुखावले होते.

काल वाढदिवस होता. त्यातच भाजपचे सर्वेसर्वा अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या थेटभेट शुभेच्छा आणि विठ्ठल-रखूमाई पूजा सोहळा.ही सबंध चित्रसंगती नजरेसमोर उभी राहील्यावर देवेन भाऊंना "लागली आस" अशी तन्मयी उत्कटता दाटून आली होती. मात्र त्यानंतर मराठा अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारीला पंढरपूरी न जाण्याचा कटू निर्णय देवेन भाऊंनी जाहीर केला आणि दादर येथील भाजपच्या "वसंतस्मृती" कार्यालयातूनच पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाला साष्टांग दंडवत घालत साकडे घातले ते असे असावे. 

चुकली रे भेट 

चुकली रे भेट ! तुझी माझी ताटातुट ! मज करूणा अविट ! आता सांगू कुणाला ! 

माझ्या पंढरीच्या राया !आसुसलो नमन कराया ! तुझे चरण धराया! लागली आस मला ! 

मागणी मराठा आरक्षण !अडथळा ठरे प्रदक्षिण ! प्रसंग आकस्मिक निर्माण ! अवतरला कैचा ! 

वाट कठीण बिकट ! विवीध मोर्चाची संकटं!मी सोडवीन सरसकट ! लाभु दे साथ तुझी ! 


वर्षे सरली चार ! तरीही नित्यदिन घोर! संकटे येती अपार ! विघ्नं शमव रे राणा ! 

महत्वाच हे साल ! कर कष्टाच मोल ! पदरी 2019 घाल ! देवा आळवणी तुला ! 

खुर्ची राहुदे घट्ट ! नको कसलेच सावट ! राहो अबाधित विट ! ध्यान ठेव रे वैष्णवा ! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com