devendra fadanvise | Sarkarnama

पद वा सत्तेचा अहंकार केल्यास गत राष्ट्रवादीसारखी : फडणवीस

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पिंपरी : पिंपरी भाजपला राज्यभर मिळालेला विजय हा विकास आणि विश्‍वासाच्या राजकारणाचा आहे. तो कायम असेपर्यंत जनता साथ देईल, याचे भान ठेवा. विजयाने उन्मत्त न होता मालक नव्हे, तर सेवक म्हणून वागा''असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी चिंचवड येथे पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला. पद वा सत्तेचा अहंकार केला, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादीसारखी गत होईल, असा इशाराही त्यांनी दिला. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. 

34 वर्षानंतर उद्योगनगरीत भरलेल्या दोन दिवसाच्या या अधिवेशनाचे सूप वाजले. यावेळी फडणवीस यांनी समारोपाच्या तासभर भाषणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगल्या कानपिचक्‍या दिल्या. ते म्हणाले, सेवकाऐवजी मालकासारखे वागू लागल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादीची सध्याची गत झाली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व टीमने काही ठिकाणी सत्तेतून तर, काहीजागी शून्यातून नुकत्याच मिळविलेल्या सत्तेचा अहंकार होऊ देऊ नका. ती कुठल्याही लाटेतून मिळालेली नाही. ज्याप्रमाणे भरताने राजा नव्हे,तर जनतेचा सेवक म्हणून रामाच्या 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात राज्य सांभाळले.त्याच भूमिकेतून राम असलेल्या जनतेने दिलेली ही सत्ता व राज्य आपल्याला सांभाळायचे आहे. जो जो राजा अहंकारी झाला, त्याचा अहंकार प्रजेने तथा जनतेने तोडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे या विजयातून हा धडा घेण्याची गरज आहे. जबाबदारीची जाणीव त्यातून आली पाहिजे. दिलेल्या सत्तेचा उपयोग परिवर्तनासाठी झाला पाहिजे.म्हणून समाज परिवर्तनाची ही ऐतिहासिक जबाबदारी र्आपल्यावर आहे. पक्ष कोणामुळेही थांबत नाही, हे लक्षात घ्या'' 

शेतकरी कर्जमुक्तीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेवर मुख्यमंत्र्यांनी उपरोधिक टीका केली. यानिमित्ताने 15 वर्षानंतर सत्तेमुळे हवेत गेलेले विरोधक जमिनीवर आले व ते समाजात गेले, याचा आनंद आहे, असे ते म्हणाले, मात्र, ज्यांच्यासाठी त्यांनी ही यात्रा काढली त्या शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला विरोधकच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त पक्ष संवाद यात्रा काढणार असून त्यात राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांची त्यांच्या शिवारात जाऊन भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या यात्रेत पक्षाचे पाच लाख कार्यकर्ते पन्नास लाख घरात जाऊन दोन कोटी लोकांपर्यंत पोचणार असल्याचे ते म्हणाले.सुराज्य येत नाही,तोपर्यंत काम करीत राहा,अशा शब्दांत कार्यकर्त्यांना देताना त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. 

""जो पदाधिकारी पारदर्शक काम करणार नाही,त्याला सत्तेवर ठेवणार नाही, मग भले तेथील सत्ता गेली,तरी चालेल.पालिकांच्या स्थायी समितीत होणारे अंडरस्टॅंडिंग होऊ देणार नाही''. 
ृ- देवेंद्र फडणवीस 

संबंधित लेख