Devendra Fadanvis Pune function | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचा आवाज "75 डेसिबल'मध्ये बसणार का ? 

पांडुरंग सरोदे 
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

 दहीहंडी आणि गणेशोत्सवात 'दोनच ध्वनिक्षेपक लावायचे,' '75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको,' अशा स्वरूपाच्या अटी पुणे पोलिसांनी ध्वनी- प्रकाश व्यावसायिकांना घातल्या आहेत.  कायदा सर्वांसाठी समान असल्याने  मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही  हा ध्वनी प्रदूषण मर्यादेचा नियम लागू होतो काय याविषयी औत्सुक्य आहे . 

पुणे :  दहीहंडी आणि गणेशोत्सवात 'दोनच ध्वनिक्षेपक लावायचे,' '75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको,' अशा स्वरूपाच्या अटी पुणे पोलिसांनी ध्वनी- प्रकाश व्यावसायिकांना घातल्या आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषण मर्यादेचा हा नियम उद्या पुण्यनगरीत होणाऱ्या कार्यक्रमास पोलीस आयुक्त लावतात का ? याकडे गणेश मंडळांचे आणि  ध्वनी- प्रकाश व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे . 
 

पुण्यातील शनिवारवाड्यासमोर शनिवारी महापालिकेने आयोजित केलेल्या "शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम'चे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.  

मूळ मुद्दा असा आहे, की दहीहंडी, गणेशोत्सवात "दोनच ध्वनिक्षेपक लावायचे,' '75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको,' अशा स्वरूपाच्या अटी पुणे पोलिसांनी ध्वनी, प्रकाश व्यावसायिकांना घातल्या आहेत. त्यामुळे शहरातील "लाइट, साऊंड ऍण्ड जनरेटर असोसिएशन'ने दहीहंडी ते गणेशोत्सवामध्ये ध्वनी किंवा प्रकाश योजना न पुरविण्याचा निर्णय घेत बंद पुकारला आहे. 

दहीहंडी, गणेशोत्सव मोठ्या दिमाखात लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम शहरातील लाइट, साऊंड व्यावसायिक करतात. त्यांनीच उत्सवाकडे पाठ फिरविल्यामुळे उत्सवाचे कसे होणार ? असा प्रश्‍न दहीहंडी, गणेशोत्सव मंडळांना सध्या पडू लागला आहे. लाईट, साऊंड व्यावसायिकांनी बंद पुकारला. तरीही महापौर मुक्ता टिळक किंवा पालकमंत्री गिरीष बापट यांनी त्यांची दखल घ्यावीशी वाटलेली नाही, अशी त्यांच्यामध्ये चर्चा आहे. 

 

 

संबंधित लेख