devendra fadanvis, mumbai | Sarkarnama

"आमच्या वर्ध्याले काहून विसरले जी !'  शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांला सवाल 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 4 जुलै 2017

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली यादी वादात सापडली असतानाच मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील वर्धा जिल्ह्याचा उल्लेखच केला नाही. यामुळे जिल्ह्यातील 'आमच्या वर्ध्याले काहून विसरले जी!' आम्ही कर्जबाजारी न्हाय का ? असा सवाल वर्ध्यातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी राज्यातील सर्व जिह्यात मिळून 36 लाख 10 हजार 126 शेतकऱ्यांची जिल्ह्याप्रमाणे माहिती आपल्या ट्विटरवरून जाहीर केली आहे. मात्र या माहीतीत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या वर्ध्या जिल्ह्याचा उल्लेखच मुख्यमंत्रांनी केला नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. आमच्या वर्ध्याले काहून विसरले की आम्हाला कर्जमाफी द्यायचीच नाही ? असाही सवाल जिह्यातील शेतकरी उपस्थित करत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जयराम सांगळे यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिली. 

सरकार आणि अधिकारी आम्हाला मुळातच कर्जमाफीच्या प्रश्नावर अजूनही स्पष्ट भूमिका सांगत नाहीत अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांच्या माहितीत जर आमचा वर्धा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यांचा उल्लेख 36 लाख शेतकऱ्यांत नसेल तर आम्ही काय समजायचे असा सवालही सांगळे यांनी केला आहे. 

संबंधित लेख