देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला, त्यांचे आभार : गोपीचंद पडळकर

देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला, त्यांचे आभार : गोपीचंद पडळकर

पुणे : 'धनगर समाजासाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला असून त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मात्र आता धनगर समाजाच्या मागणीप्रमाणे एसटी प्रवर्गाचे दाखलेही द्यावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

धनगर समाजासाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. शिवाय धनगर समाजाच्या मागणीप्रमाणे 'धनगड' अस्तित्वात नसल्याचे प्रतिज्ञापत्रही राज्य सरकारने न्यायालयात दाखल केले आहे. त्यानंतर आता एसटी प्रवर्गाचे दाखले मिळावेत अशी मागणी पडळकर यांच्याकडून करण्यात आली आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

या संदर्भात बोलताना पडळकर म्हणाले, `'दिलेला शब्द पाळल्याबद्दल फडणवीस यांचे अभिनंदन आणि आभार, पण एसटी प्रवर्गाच्या दाखल्यांच्या मागणीवर आम्ही कायम आहोत. शिवाय न्यायालयात सुरु असलेली सुनावणी दैनंदिन स्वरूपात घेतली जावी, अशीही आमची मागणी आहे. राज्यात आजवर धनगर समाजाची ३५ आंदोलने झालेली असून आमचा अखेरचा लढाही आक्रमकपणे सुरु राहणार आहे.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com