मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वसंतराव नाईकांच्या विक्रमाची बरोबरी साधणार ? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वसंतराव नाईकांच्या विक्रमाची बरोबरी साधणार ? 

पुणे : राज्याचे सलग पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी आतापर्यंत केवळ वसंतराव नाईक यांना मिळाली. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार वर्षाचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात पूर्ण करतील. मात्र ते पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून वसंतराव नाईक यांच्या विक्रमाची बरोबरी साधणार का त्याआधीच राजकीय उलथापालथ होऊन त्यांचे पद जाणार हे पुढच्या वर्षात स्पष्ट होईल. 

1420 दिवसांचा कार्यकाल पूर्ण करून सध्यापुरते तरी फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कालावधीशी बरोबरी केली आहे. युती सरकारच्या काळात मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते. मात्र जोशी यांचा राजीनामा घेऊन नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यात आले.राणे यांनी आठ महिने काम केल्यानंतर पाच वर्षे पूर्ण व्हायला सहा महिने शिल्लक असताना राज्य सरकार बरखास्त करून निवडणुका जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे राणे यांनाही फार काळ मिळाला नाही तसेच जोशी यांनाही चार वर्षे पूर्ण करता आली नाहीत. 

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण यांनी सुरवातीला सुमारे दोन वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. त्यावेळी केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणून त्यांना त्यावेळचे पंतप्रधान पंडीत नेहरू यांना दिल्लीला बोलावले. चव्हाण यांच्या जागी वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

त्यानंतर सलग 11 वर्षे नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इतका प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेले तसेच पाच वर्षाची टर्म पूर्ण केलेले नाईक हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करायला फडणवीस यांना 13 महिन्यांचा कार्यकाल बाकी आहे. तापर्यंत ते या पदावर राहिले तर ते नाईक यांच्या कार्यकालाची ते बरोरी करू शकणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com