devendra fadanvice vc in mantralay | Sarkarnama

राज्यातील प्रलंबति प्रकल्प मुदतीत पूर्ण करा ः मुख्यमंत्री 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रेल्वे पूल, जलवाहिनी, नदीपात्राचे रुंदीकरण, सांडपाणी निचरा, पर्यटनाला आणि एकंदरीतच जिल्ह्याचे परिवर्तन करणारे प्रकल्प मुदतीत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. 

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रेल्वे पूल, जलवाहिनी, नदीपात्राचे रुंदीकरण, सांडपाणी निचरा, पर्यटनाला आणि एकंदरीतच जिल्ह्याचे परिवर्तन करणारे प्रकल्प मुदतीत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. 

मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रुममध्ये जिल्हा परिवर्तनीय प्रकल्प मोहिमेचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी या मोहिमेंतर्गत निवडण्यात आलेल्या अमरावती, रायगड, सोलापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, नाशिक, गडचिरोली या जिल्ह्यांतील विशेष प्रकल्पांचा आढावा व्हिडीओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आला. ज्या जिल्हा प्रकल्पांना निधी मंजूर आहे.

प्रशासकीय मान्यता देखील मिळाल्या आहेत. त्यामुळे विहित कालमर्यादेत ते पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत. या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या विकासाबरोबरच सामान्यांना देखील त्याचा लाभ होणार असल्याने विशेष लक्ष देऊन ते पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.अमरावती राजापेठ येथे रेल्वे पूल आणि भुयारी मार्गाचा कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. 

रायगड येथील किल्ल्यावरील सुशोभिकरणाची कामे भारतीय पुरातत्व खात्याच्या मदतीने पूर्ण करावीत. रायगड किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप आणि कनिष्ठ अभियंत्यांची पदे तातडीने उपलब्ध करुन द्यावीत. या ठिकाणच्या रोपवेच्या कामाला गती द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या प्रगतीचा, औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या समांतर जलवाहिनी योजनेचा देखील मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. 

संबंधित लेख