devendra fadanvice present bjps dahihandi | Sarkarnama

भाजपशी संबंधित दहीहंड्यांना मुख्यमंत्र्यांची भेटी ? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

मुंबई ः दहिहंडी हा तसा साहसी क्रीडाप्रकार. दहिहंडी फोडताना गोविंदा जखमी होणे हे आलेच. त्यामुळे या उत्सवावर बंदी आणण्याचीही मागणी करण्यात येते. या सर्व वादप्रवादांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दहिहंडीपासून दूर राहणे पसंद करतात काय ? असा सवाल केला जात असतानाच खुद्द मुख्यमंत्री यावेळी या उत्साहात सहभागी झाले आहेत. त्यांनी ठाण्यातील दहिहंडीला पहिली भेट दिली. 

दरम्यान, फडणवीस दहीहंडीच्या पूर्वघोषित कार्यक्रमानुसार केवळ भाजपशी संबंधित दहिहंड्यांनाच भेटी देणार आहेत. 

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी ते आमचे कृष्ण आहेत असे वर्णन करीत देवेंद्र महिमा आळवला तरीही फडणवीस या साहसी क्रीडाप्रकारात सक्रीय काही होत नव्हते. आता लोकसभा निवडणुकीला केवळ काही महिने शिल्लक असताना फडणवीस या गोपाळकाल्यात समरसून उतरल्याचे चित्र निर्माण करीत आहेत. त्यांना राजकारणात हव्याशा वाटणाऱ्या मंडळींच्या दहीहंडीला ते आज हजर झाले. 

आमदार संजय केळकर यांचे नेतृत्व भाजपत रूजलेले. शिवाजीराव पाटील हे माथाडी कामगारांचे नेते. त्यांनी केळकर यांना साथ देत आयोजित केलेली हंडी ठाण्यातल्या महोत्सवात स्टार स्टेटस मिळवणार आहे ती फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे. 

ठाण्यातील दहीहंडीला फडणवीस निघाले ते केळकरांचे स्थान बळकट करायला. त्यानंतर एकेकाळी राष्ट्रवादीत असलेल्या कपिल पाटील यांचा भाजपत खासदार म्हणून असलेला वावर वाढावा यासाठी भिवंडीत त्यांच्या मतदारसंघात ते जाणार आहेत. 

मनसेतून भाजपमध्ये आलेले आमदार राम कदम हे पक्षात चांगलेच स्थिरावले आहेत. त्यांचे कार्यालय 24 तास उघडे असते, ते हजारो भगिनींना राखी बांधतात, मतदारसंघातील वृद्धांना तीर्थयात्रेला नेतात शिवाय फडणवीस यांच्या समर्थनार्थ हिरीरीने विधाने करतात. त्यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री गेल्या वर्षी गेले होते. या ही वर्षी ते जाणार आहेत. 

पाठिराख्यांना समर्थकांना खूष करण्यासाठी फडणवीस त्यांच्या शहरी व्यक्‍तीमत्वाला काहीशी मुरड घालून उत्सवांमध्ये सक्रीय झाले आहेत. शिवसेना आणि भाजप यांचे परस्परांशी चांगले आहेत अशी चर्चा जोरात आहे पण फडणवीस दहीहंडीच्या पूर्वघोषित कार्यक्रमानुसार केवळ भाजपशी संबंधित हंड्यांनाच भेटी देणार आहेत. निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकणे आवश्‍यक असतेच, महाराष्ट्राच्या भल्यासाठी प्रयत्न करणारे फडणवीस अर्थातच सर्वाधिक जागा जिंकण्याची हंडी फोडण्यासाठी सक्रीय झाले आहेत. 
 
संबंधित लेख