devendra fadanvice maratha reservation | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

Maratha Reservation देवेंद्र फडणवीस आगे बडो, हम तुम्हारे साथ है !:

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा अहवाल विधिमंडळात मांडण्यात येण्यापूर्वी भाजप-शिवसेना युतीच्या सदस्य भगवे फेटे लावून सभागृहात आगमन झाले आणि या सदस्यांनी देवेंद्र फडणवीस आगे बडो, हम तुम्हारे साथ है ! अशी जोरदार घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. 

मराठा आरक्षणासंदर्भातला कायदा याच अधिवेशनात मंजूर करू, त्यासाठी वेळ कमी पडला तर अधिवेशनाचा कालावधी वाढवू अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण कसले करता 1 डिसेंबररोजी जल्लोश करा असे आवाहन मराठा समाजाला केले होते. त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा एटीआर आज विधिमंडळात सादर करण्यात आला आहे. 

नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा फडणवीस सरकार तयार आहे. ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता हे आरक्षण देण्यात येणार आहे. विधानसभेच्या पायऱ्यावर युतीच्या सदस्यांनी पेढे वाटून जोरदार घोषणाबाजी केली. 

संबंधित लेख