devendra fadanvice angry with officers | Sarkarnama

प्रशासन का हलत नाही ? मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर भडकले 

कानोजी 
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

भीमा कोरेगाव आणि मराठा मोर्च्यातील आंदोलकांवरचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे नसतील तर मागे घेतले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली 13 मार्च रोजी. त्या घटनेला आता महिने लोटले पण हालचाल अशी ती झाली नाहीच. गृह विभागाच्या आढाव्याची बैठक आयोजित झाली तेंव्हा गुन्हे मागे घेण्याचा विषय निघाला.यासंबंधात कोणतीही हालचाल झाली नाही केवळ दोनदा परिपत्रके तेवढी काढली गेली आहेत हे लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले.

खऱे तर ते कमालीचे शांत आणि संयत.पण अशा महत्वाच्या घोषणा प्रत्यक्षात येत नसल्याने मला खोटे पडायची वेळ येईल. प्रशासन हलत का नाही असा प्रश्‍न त्यांनी दहा महत्वाच्या अधिकाऱ्यांसमोर केला. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, रणजित पाटील दोघेही हजर होते. मुख्यमंत्री जाहीरपणे वैताग कधी नव्हे ते दाखवते झाल्याने सारेच हतबुध्द झाले, आता पुन्हा एकदा गुन्हे मागे घेण्यासाठी समिती स्थापण्यात आली आहे. ही समिती किती दिवस घेते अन कितीजणांना वैतागवते ते आता दिसेलच. 

संबंधित लेख