devendra and soniya gandhi | Sarkarnama

नगरमध्ये आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला असता - फडणवीस

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मुंबई : नगरच्या महापौरपदासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला असता शिवसेनेला पाठिंबा द्यायची आमची तयारी होती पण आमच्याकडे कुणी पाठिंबाच मागितला नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विशेष पत्रकारपरिषदेत दिले. 

ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणात गांधी परिवारावर शस्त्रास्त्र दलाल मिशेल यांने आरोप केले असून त्याने सोनिया गांधी यांचे नाव घेतले असून कॉंग्रेस पक्षाने व गांधी परिवाराने याचा खुलासा करावा अशी मागणीही फडणवीस यांनी केली. ऑगस्ट वेस्टलॅंड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर चौफेर टीका केली. 

या घोटाळ्याप्रकरणी गांधी कुटुंबीयांनी उत्तर द्यावं, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव घेण्यात आले आहे. हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातील दलाल ख्रिश्‍चन मायकेल याने जबाब देताना श्रीमती गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला. त्याच्या बोलण्यात भारताचा पंतप्रधान होणारा इटालियन महिलेचा मुलगा असाही उल्लेख आला. मात्र, त्याच्याकडून अधिक माहिती घेणे शक्‍य झाले नाही, असा दावा ईडीनं शनिवारी कोर्टात केला. याचाच संदर्भ देत फडणवीस म्हणाले इटली कोर्टाच्या निकालपत्रात सोनिया गांधींचे चार वेळा नाव आले आहे. त्यामुळे या घोटाळ्या प्रकरणी गांधी कुटुंबीयांनी स्पष्टीकरण द्यावे. फडणवीस यांच्याप्रमाणेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गांधी घराण्यावर टीका करून सोनिया गांधी यांनी या आरोपाचे उत्तर द्यावे असे म्हठले आहे. 

संबंधित लेख