deshmukh-kakade | Sarkarnama

सुभाष देशमुख व संजय काकडे होणार व्याही!

तुषार खरात : सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई, ता. : राजकारण व उद्योग क्षेत्रात नावलौकीक असलेले भाजपमधील दोन दिग्गज आता व्याही होत आहेत. राज्याचे सहकार - पणन मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन आणि खासदार संजय काकडे यांची मुलगी कोमल यांचा विवाह येत्या सात मे रोजी पुण्यात होत आहे. 

पंधरवडाच शिल्लक राहिल्याने दोन्ही कुटुंबीयांची लगीनघाई घाई सुरू आहे. केंद्र व राज्यातील मंत्री, आमदार, खासदार, उद्योजक, सेलिब्रिटी अशा व्हीआयपींना निमंत्रित पत्रिका धाडण्याचे काम जोरात सुरू आहे. निमंत्रण पत्रिकेच गाठोडंच इतक मोठं आहे की, हा आहेरच वाटावा. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीचा मुहूर्त साधून देशमुख यांचे कर्मचारी सर्व मंत्री व आयएएस अधिकारी यांना निमंत्रणे देण्यात व्यस्त होते. 
काकडे यांची एकुलती एक कन्या असल्याने त्यांना हे लग्न धुमधडाक्‍यात करायचे आहे. पण लग्नाचा मोठा भपका केला तर विनाकारण टीकेचे मोहोळ उठेल म्हणून मंत्री सुभाष देशमुख यांना हे लग्न साध्या पद्धतीने करायचे आहे. त्यासाठी त्यांनी खासदार काकडे यांना समजून सांगण्याचा प्रयत्नशील केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्च्या मुलाचा शाही विवाह राज्यातील जनता अद्याप विसरली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अनिल भोसले हे काकडे यांचे व्याही आहेत. भोसले यांच्या पत्नी रेश्‍मा या पुणे महापालिकेत भाजपकडून निवडून आल्या आहेत.  

संबंधित लेख