लोकसभा अध्यक्षांची मुलगी पहिल्याच प्रयत्नात आयएएस...यशाचे श्रेय मोठ्या बहिणीला

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्येनेयूपीएससीत यश मिळवले आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात हे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
Lok Sabha Speaker Om Birla daughter selected for civil services
Lok Sabha Speaker Om Birla daughter selected for civil services

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या अंजली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवले असून, तिची सनदी सेवेसाठी निवड झाली आहे. यूपीएससीने आज 89 राखीव उमेदवारांची यादी जाहीर केली. यात अंजलीचा समावेश आहे. तिने या यशाचे श्रेय मोठ्या बहिणीला दिले आहे. 

अंजलीने रामजस कॉलेजमधून राज्यशास्त्राचे (ऑनर्स) शिक्षण घेतले आहे. तिने 2019 मध्ये यूपीएससी परीक्षा 2019 मध्ये दिली होती. पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळाले आहे. तिच्या या कामगिरीचे मोठे कौतुक होत आहे. या यशाबद्दल बोलताना अंजली म्हणाली की, माझी निवड झाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. सनदी सेवेमध्ये रूजू होऊन मला नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. देशातील जनतेप्रती माझ्या वडिलांची असलेली कटिबद्धता पाहून मला याची प्रेरणा मिळाली. 

अंजलीची मोठी बहीण आकांक्षा ही चार्टर्ड अकाउंटंट आहे. तिने यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अंजलीला मदत केली. याविषयी अंजली म्हणाली की, माझ्या यशाचे श्रेय विशेषत: माझ्या मोठ्या बहिणीला जाते. मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने मोठी मदत केली. 

यूपीएससीकडून सनदी सेवा परीक्षा दरवर्षी तीन टप्प्यात घेतली जाते. यात पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यांचा समावेश असतो. यातून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) यासह इतर सेवांसाठी निवड केली जाते. 

सनदी सेवांच्या 2019 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल मागील वर्षी 4 ऑगस्टला जाहीर झाला होता. यात 829 उमेदवार पास झाले होते. त्यांची आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि केंद्रीय सेवेतील अ व ब गटातील पदांसाठी निवड झाली होती. आयोगाने राखीव 89 उमेदवारांची यादी आता जाहीर केली आहे. यात अंजली यांचा समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com