deputy collector posting | Sarkarnama

उपजिल्हाधिकाऱ्यांचे देव पाण्यात ! 

गोविंद तुपे 
शुक्रवार, 26 मे 2017

 बरेच अधिकारी सध्याही प्रतिनियुक्तीवर आहेत. आणि त्यातील काही अधिका-यांना दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच विशेष बाब म्हणून परवानगी दिली आहे. त्यामुळे उर्वरित अधिकारीही या मार्गाचा अवलंब करण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई : नियमित-अनियमित बदल्यांच्या सुरू असलेल्या या हंगामात सर्वांचेच लक्ष उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांकडे लागले आहे. याच बदल्यासंदर्भात या दोन दिवसात नागरी सेवा मंडळाची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत मंत्री, सचिव कुणाची वर्णी कुठे लावणार, याकडे सर्वच उपजिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

राज्यात एकूण जवळपास 600 उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे आहेत. यातील नियमित बदल्यांसाठी फक्त तीसच अधिकारी पात्र आहेत. मात्र डेप्युटेशन साठी आलेल्या बदली अर्जांची संख्या 118 आहे. तर विनंती बदल्यांची संख्या तर सर्वाधिक आहे. त्यात मुंबई पुण्यासारख्या शहरात बदली मागणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत कुणाची कुठे वर्णी लावायची असा प्रश्न महसूल विभातील अधिकाऱ्यांच्या समोर आहे. यात कळस म्हणजे काही अधिकाऱ्यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांकडूनच पालकमंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या पत्रावर शेरा मारून आणला आहे. त्यामुळे तर विभागातील अधिकाऱ्यांची पुरती गोची झाली आहे. 

कुठल्याही विभागात अधिकारी 10 वर्षे प्रतिनियुक्तीवर काम करू शकतात असा नियम आहे. मात्र 10 वर्षापेक्षा अधिक काळ प्रतिनियुक्तीवर काम कलेले जवळपास 20 उपजिल्हाधिकारी आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना मूळ विभागात पाठविण्याची शिफारस बदलीच्या फाईलवर विभागाने केली आहे.  

संबंधित लेख