Demand in State for Raj Thakres' Public Meetings | Sarkarnama

राज ठाकरेंच्या सभांना आता राज्यभरातून मागणी; नगरमध्ये घ्या, संग्राम जगतापांचा आग्रह

उत्तम कुटे
रविवार, 14 एप्रिल 2019

पाडव्याची आणि गेल्या शुक्रवारची (ता.12) नांदेडची राज्य दौऱ्यातील पहिलीच सभा हीट झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना आता राज्यभरातून मागणी वाढली आहे. नगरचे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडून नगरमध्ये सभा घेण्यासाठी आग्रह सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

पिंपरी : पाडव्याची आणि गेल्या शुक्रवारची (ता.12) नांदेडची राज्य दौऱ्यातील पहिलीच सभा हीट झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना आता राज्यभरातून मागणी वाढली आहे. नगरचे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडून नगरमध्ये सभा घेण्यासाठी आग्रह सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्रातून राज यांचा मोदींविरुद्ध वन आर्मी लढा सुरु आहे. त्यांच्या  राज्य दौऱ्यात तूर्त दहा सभांचे नियोजन आहे. दुसरीकडे राज्याच्या सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघात सभा घ्या, अशी मागणी आली आहे. मात्र,ती शक्य नसल्याचे मनसेचे प्रभारी किशोर शिंदे व अॅड. गणेश सातपुते यांनी सांगितले. नगरचे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडूनही अशी सभा होण्यासाठी आग्रह सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाडव्याची मु्ंबईतील राज यांची सभा वादळी ठरली. सोशल मिडियात ती गाजली. त्यात त्यांनी मोदी व शहामुक्त भारत करण्याची घोषणा केली. ती का केली हे पटवून देण्यासाठी त्यांनी १२ तारखेपासून राज्य दौऱा सुरु केला आहे.  त्यातील पहिली सभा नांदडेला झाली. पाडवा व या सभेला प्रचंड गर्दी झाली. शिवाय राज यांच्या घणाघाती वक्रृत्वाने या दोन्ही सभा गाजल्या. ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्या पोटातच त्यामुळे गोळा आला. गत लोकसभेला पिंपरी-चिंचवडला झालेल्या त्यांच्या अशा एका सभेने निवडणूकीचे चित्रच पालटून टाकले होते.

त्यामुळे मावळच नव्हे,तर नगरसह राज्यभरातून सगळीकडूनच त्यांच्या सभांना मागणी येत आहे. मात्र, मावळसाठीची सभा यावेळी घाटावर न होता घाटाखाली होणार असल्याचे कळते.उद्या (ता.१५) सोलापूर,परवा (ता.१६) कोल्हापूर,तर बुधवारी (ता.१७) सातारा येथे त्यांची तोफ धडाडणार आहे. तर,बारामती,पुणे शहर आणि शिरूर मतदारसंघासाठी येत्या गुरुवारी (ता.१८) पुण्यात शिंदे मैदान, सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक येथे सायंकाळी साडेपाच वाजता राज यांची सभा होणार आहे.

संबंधित लेख