deevakar rawate shivsena | Sarkarnama

शेतकऱ्यांचे पुनर्गठीत कर्जही माफ केले जाणार - दिवाकर रावते

ब्रह्मा चट्टे
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई : नवीन कर्ज मिळत नाही म्हणून थकित कर्ज चुकते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारने यापुर्वी पीककर्ज पुनर्गठीत करून दिले आहे. सरकारने शेतकऱ्यांचे पुनर्गठित कर्ज माफ केले जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. ते मंत्रालयात बोलत होते. 

दिवाकर रावते पुढे म्हणाले, " शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज वाटप होणार आहे. महाराष्ट्रातील 32 जिल्हा बॅंकांपैकी 14 जिल्हा बॅंका या आधीच आर्थिकदष्ट्या डबघाईला आलेल्या आहेत. नोटाबंदीच्या काळातील 2771 कोटी इतकी रक्कम जिल्हा बॅंकांमध्ये पडून आहे. त्या रक्कमेचे व्याज व ही रक्कम गुंतवणूक केली नसल्याने तोट्याच्या चक्रात बॅंका अडकल्या आहेत. नोटबंदीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. बॅंकांनी जुन्या नोटा स्वीकारल्या आहेत. या जुन्या नोटा आरबीआयने ताबडतोब बदलून द्याव्या अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली. 

ते पुढे म्हणाले, " जिल्हा बॅंका अडचणीत आल्याने राज्यातील शेतकऱ्यांना पतपुरवठा करणारी व्यवस्था कोलमडून पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या पाशात ढकलून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होणार आहे. त्यामुळे जुन्या नोटा बदलून दिल्याशिवाय बॅंकाचे आर्थकारण सुरळीत चालणार नाही. या नोटा ज्या कोणाच्या आहेत. त्यांची चौकशी केली आहे. त्यात जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करावी. मात्र बॅंकेचे अर्थकारण थांबवणे चुकीचे आहे. 

याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. वर्धा, नांदेड, बुलढाणा या बॅंका डबघाईला आल्या असताना सरकारने त्यांना त्यावेळी आर्थिक मदत केली होती. जर आरबीआय कोणतेच पाऊल उचलत नसेल तर सरकारने जिल्हा बॅंकांना मदत करावी अशी मागणीही रावते यांनी केली. 

संबंधित लेख