deepak mankar and ncp pune | Sarkarnama

दीपक मानकर यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

उमेश घोंगडे
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांना सर्वोच्च न्यायालयाने 10 विदसात पोलिसांत हजर होण्याचे आदेश दिल्याने अटक टाळण्याचे त्यांचे सारे प्रयत्न अखेर फोल ठरले आहेत. मानकर यांच्या संबंधातील एका व्यक्तीने दोन जून रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात मानकर यांच्यासह इतर चारजणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करीत असल्याने मानकर यांना अद्याप अटक करण्यात आली नव्हती. पुणे जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांना सर्वोच्च न्यायालयाने 10 विदसात पोलिसांत हजर होण्याचे आदेश दिल्याने अटक टाळण्याचे त्यांचे सारे प्रयत्न अखेर फोल ठरले आहेत. मानकर यांच्या संबंधातील एका व्यक्तीने दोन जून रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात मानकर यांच्यासह इतर चारजणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करीत असल्याने मानकर यांना अद्याप अटक करण्यात आली नव्हती. पुणे जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारत 10 दिवसात पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

न्यायालयाच्या निर्णयामुळे मानकर यांना आता पुणे पोलिसांकडे हजर व्हावे लागणार आहे. आत्महत्या केलेली संबंधित व्यक्ती आत्महत्या करण्याची धमकी देत असलल्याचे पत्र मानकर यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना एक जून रोजी दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन जूनला या व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. मानकर हे पुणे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असल्याने तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी त्यांचे नाव गेली तीन महिने आघाडीवर आहे. गेल्या महिन्यात शहराध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र या घटनेमुळे त्यांचे नाम मागे पडले व त्यानंतर पक्षाने नव्या अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रियादेखील थांबवली आहे. या पार्श्‍वभूमीवर मानकर यांच्या जामीन अर्जाबाबतच्या न्यायालयाच्या निकालाला विशेष महत्व आहे. 

संबंधित लेख