deepak kesarkar reply about airport | Sarkarnama

राणेंनी कागदाचे विमान उडवायला सांगितले होते, मात्र मी खरे विमान उडवून दाखवले ! 

अमोल टेंबकर 
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे मी कोणावर टीका करू इच्छित नाही.

सावंतवाडी (रत्नागिरी) : नारायण राणे यांनी मला कागदाचे विमान उडवायला सांगितले होते मात्र मी खरे विमान उडवून दाखवले आहे. त्यामुळे आता कोणाच्या पोटात दुखण्याची गरज नाही, अशी टीका पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. 

विमानतळाच्या उद्‌घाटनानंतर पालकमंत्र्यांनी खाजगी विमान उतरवले, तो सर्व प्रकार श्रेयासाठी होता परवानगी नसल्यामुळे हे लॅंडिंग अनधिकृत आहे अशी टीका राणेंनी केली होती. या टिकेला उत्तर देण्यासाठी श्री केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. 

ते म्हणाले गेली अनेक वर्षे विमानतळ अर्धवट होते. ते पूर्ण करण्याचे काम पालकमंत्री या नात्याने मी केले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे मी कोणावर टीका करू इच्छित नाही. राणेंनी यापूर्वी माझ्यावर कागदाचे विमान उडवा अशी टीका केली होती.मात्र प्रत्यक्षात मी खरे विमान उडवून दाखवले आहे त्यामुळे आता कोणाच्या पोटात दुखण्याची गरज नाही. 

केसरकर पुढे म्हणाले, चिपी येथे झालेले विमानतळ खाजगी आहे. त्यामुळे त्याठिकाणी भविष्यात सुद्धा खाजगी विमान उडणार आहे त्यामुळे ते विमान कोणी उडवले, त्याचे पेमेंट कोणी केले याचा शोध घेण्याची गरज नाही. त्यासाठी आवश्‍यक असलेले रेकॉर्ड राणेंना कधीही उपलब्ध होऊ शकते. आता टीका करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासाला महत्त्व देणे गरजेचे आहे. 

संबंधित लेख