सासू केशरकाकूंच्या प्रोत्साहनामुळे डॉ. दीपा क्षीरसागर यांना सिद्ध करता आले आपले कर्तृत्व...

आईचे प्रेम दिले त्यांनी - डॉ. दीपा क्षीरसागरमाझ्या दिवंगत सासू माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर या पुरोगामी विचाराच्या होत्या. रझाकाराच्या काळात त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. सून म्हणून घरी आल्यानंतर माझे पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले होते. मी पुढे शिकावे ही त्यांचीच इच्छा होती. बाळंतपणानंतर चौथ्याच दिवशी "एमए'ची परीक्षा होती. आई डॉ. सुहासिनी इर्लेकर यांच्यासह बाळ मांडीवर घेऊन सायकल रिक्षातून परीक्षा केंद्रावर जात असे. पुढे मी नोकरी करावी असा त्यांचाच आग्रह होता. प्राचार्य पद घ्यायला मी घाबरत होते पण तरुणवयातच कर्तृत्व दाखविता येते अशी हिंमत त्यांनी दिली. पंचायत समितीचे सभापतीपदही त्यांनीच दिले. सासू असूनही आईचे प्रेम त्यांनीच दिले.
सासू केशरकाकूंच्या प्रोत्साहनामुळे डॉ. दीपा क्षीरसागर यांना सिद्ध करता आले आपले कर्तृत्व...

बीड : शिक्षण, प्रशासन, साहित्य, संस्कृती, महिला आणि राजकारण अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या प्रवासाचा पाया त्यांच्या दिवंगत सासू माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांनी रचला. त्यांनीच डॉ. दीपा क्षीरसागर यांना कायम प्रोत्साहन दिले. कै. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयाच्या प्राचार्या असलेल्या डॉ. दीपा भारतभूषण क्षीरसागर या दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागर यांच्या सून तर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पत्नी आहेत. लग्नानंतर त्यांचे केवळ पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले होते. पण, काकूंनी त्यांना पुढे शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. प्राचार्य पद आणि पंचायत समितीचे सभापतीपदही काकूंनीच त्यांना घ्यायला लावले. डॉ. दीपा क्षीरसागर यांनी काकूंनी दिलेल्या संधीचे सोने करत शिक्षण, नाट्य, प्रशासन, राजकारण, साहित्य व महिला क्षेत्रात काम करुन वेगळा ठसा आणि ओळख निर्माण केली आहे. 

" संत ज्ञानेश्वर आणि संत मिराबाई' यांच्या काव्याच्या तौलनिक अभ्यास या विषयावर पीएच. डी. मिळवून त्या प्राध्यापक झाल्या आणि आज पदव्युत्तर पदवीच्या द्वितीय वर्षाच्या मराठी विषयात त्यांचा हाच ग्रंथ अभ्यासक्रमात आहे. 10 वर्षे प्राध्यापक राहिलेल्या डॉ. क्षीरसागर मागच्या 22 वर्षांपासून प्राचार्या आहेत. त्यांनी आतापर्यंत संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांची मधुराभक्ती, इवलेसे रोप लावियले द्वारी, संत ज्ञानेश्वर एवं संत मीराबाई यांची मधुराभक्ती (हिंदी), कॉलेज कॅम्पस, झाले मोकळे आकाश, रंगवेध, आई मराठा कवितेतील, मागे वळून पाहताना, प्रवास जळणाऱ्या वाटा, मैत्र जीवाचे, शब्द सागर, अक्षर जागर, अध्यक्षीय भाषण (आठवे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन) आदी पुस्तके लिहिली. 

त्यांच्या "आई मराठी कवितेतली' या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि तत्कालीन राज्यपाल के. शंकरनायणन यांच्या हस्ते झाले. रंगसंवाद, सुहासिनी, बाल - तरंग, संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मुलन, मराठवाड्यातील कथा लेखिका, समीक्षा सुहासिनी, दीपार्थ आदी साहित्यांचे त्यांनी संपादन केले आहे. 
डॉ. दीपा क्षीरसागर यांनी विविध पुरस्कारांवरही मोहर उमटविली आहे. यामध्ये त्यांच्या संत ज्ञानेश्वर आणि मीराबाई यांची मधुराभक्ती ग्रंथास पुण्याच्या साहित्य प्रेमीभगिनी मंडळाचा डॉ. हे. वि. इनामदार संत साहित्य पुरस्कार, शासनातर्फे दिला जाणारा पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श अधिकारी पुरस्कार, ज्ञानरत्न पुरस्कार, गौरव पुरस्का, वुमेन्स अचीव्हमेंट अवार्ड, मराठवाडास्तरीय वीर महिला पुरस्कार, राज्यस्तरीय तेजस्वी साहित्य भूषण पुरस्कार, जिजाऊ रत्न व राज्यस्तरीय अक्‍महादेवी महिला भूषण पुरस्कार मिळाला. 

विविध क्षेत्रांत कामांचा ठसा उमटविल्याने त्यांना विविध पदांवर कामांचीही संधी मिळाली. सध्या त्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बीड शाखेच्या अध्यक्षा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा तसेच व विद्यापरिषद सदस्य व महाविद्यालये विद्यापीठ विकास महामंडळाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या बीड शाखेने आयोजित शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला. 

उर्दू कवी साहित्य परिषदेच्या सहसचिव आणि शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक विभागाच्या अशासकीय सदस्य आणि मराठवाडा युवक बिरादरीच्या विभागीय अध्यक्षा म्हणूनही त्यांना संधी मिळाली. भारत जिल्हा स्काऊट आणि गाईडच्या अध्यक्षा म्हणून काम केलेल्या डॉ. दीपा क्षीरसागर यांनी मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा, यशवंतराच चव्हाण प्रतिष्ठान, अंबाजोगाई विभागीय केंद्राच्या कार्याध्यक्षा, जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा, जिल्हा स्तरीय मराठी बाल साहित्य संमेलनाध्यक्षा, मराठवाडा साहित्य परिषदेच्या आठव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य म्हणूनही त्या काम पाहत आहेत. बीड नगर पालिकेच्या ब्रॅंड ऍम्बेसेडर आणि सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केले. विशेष म्हणजे त्या अध्यक्षा असलेल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बीड शाखेतर्फे मागच्या पाच वर्षांपासून बीडमधून राज्यस्तरीय नाट्य पुरस्कारांचे वितरण होत असून आतापर्यंत डॉ. वामन केंद्रे, सचिन खेडेकर, रोहिणी हट्टांगडी, मकरंद अनासपुरे आणि किर्ती शिलेदार या पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत. 

त्यांच्या पुढाकाराने शहरात 89 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, चौथे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन, पहिले जिल्हास्तरीय मराठी बालसाहित्य संमेलन झाले. तसेच वृद्धत्काकडे झुकल्यानंतर एकलकोंडेपणाची भावना झालेल्यांसाठी त्या दरवर्षी शहरात जेष्ठ नागरिकांसाठी संध्याकाळ हा सांस्कृतिक कार्यक्रम राबवितात. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्या सेल्फ डिफेन्स अकादमीच्या माध्यमातून विविध शाळा महाविद्यालयांत युवतींना मोफत कराटे प्रशिक्षण देत आहेत. शिक्षण, साहित्य, प्रशासन, सांस्कृतिक, नाट्य आणि राजकारण अशा क्षेत्रात ठसा उमटविलेल्या डॉ. दीपा क्षीरसागर यांनी राजकारणातही त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्या, नगरासेवक आणि नगराध्यक्ष म्हणून काम केले. 

 आईचे प्रेम दिले त्यांनी - डॉ. दीपा क्षीरसागर 
माझ्या दिवंगत सासू माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर या पुरोगामी विचाराच्या होत्या. रझाकाराच्या काळात त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. सून म्हणून घरी आल्यानंतर माझे पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले होते. मी पुढे शिकावे ही त्यांचीच इच्छा होती. बाळंतपणानंतर चौथ्याच दिवशी "एमए'ची परीक्षा होती. आई डॉ. सुहासिनी इर्लेकर यांच्यासह बाळ मांडीवर घेऊन सायकल रिक्षातून परीक्षा केंद्रावर जात असे. पुढे मी नोकरी करावी असा त्यांचाच आग्रह होता. प्राचार्य पद घ्यायला मी घाबरत होते पण तरुणवयातच कर्तृत्व दाखविता येते अशी हिंमत त्यांनी दिली. पंचायत समितीचे सभापतीपदही त्यांनीच दिले. सासू असूनही आईचे प्रेम त्यांनीच दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com